hardik-pandya-kl-rahul-koff.jpg
hardik-pandya-kl-rahul-koff.jpg 
क्रीडा

कॉफीतील हिरोगिरी ठरली नसती आफत 

शैलेश नागवेकर

क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारखे ऑस्ट्रेलियातील दिग्गज खेळाडू करतात. हे झाले मैदानावरचे प्रकार; पण हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुलसारखे आपले भारतीय खेळाडू भावनेच्या भरात मैदानाबाहेर पातळी सोडतात, तेव्हा या खेळाची सभ्यता जपणाऱ्या खेळाडूंना माना खाली घालायला लावतात. 

आक्रमक फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि तेवढेच चपळ क्षेत्ररक्षण अशी अष्टपैलू गुणवत्ता असलेल्या हार्दिक पंड्याची तुलना ग्रेट कपिलदेव यांच्याशी करण्यात येऊ लागली होती. कपिलदेव मैदानावर आणि मैदानाबाहेरही श्रेष्ठ होते. हार्दिकने मात्र तारुण्यातच पायावर थोंडा मारून घेतला. भारतीय संघातले त्याचे स्थान पक्के होते. दुबईतील आशियाई स्पर्धेत त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर तो संघाबाहेर होता. तंदुरुस्तीसाठी बरीच मेहनत घेतली. मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात अफलातून कामगिरी केल्यामुळे त्याचा तातडीने ऑस्ट्रेलियातील अखेरच्या दोन सामन्यांसाठी समावेश करण्यात आला. भले त्याची अंतिम सामन्यात निवड झाली नाही; परंतु पुढील एकदिवसीय सामन्यासाठी तो महत्त्वाचा खेळाडू होता; पण दुर्दैव कसे असते पाहा, केवळ हिरोगिरीसाठी वाचाळगिरी न खेळताच मायदेशी आणणारी ठरली. या हार्दिकबरोबर एरवी सभ्य आणि शांत वाटणाऱ्या के. एल. राहुलचीही वरात निघाली. 

काही खेळाडूंचा स्वभावच वेगळा असतो... बिनधास्त, आपल्याच ऐटीत राहणे अशा खेळाडूंना आवडत असते. असा स्वभाव आणि जीवनशैली जरूर जपावी; पण वास्तवतेचे भान जपणे तेवढेच महत्त्वाचे असते. खेळाडू येतात आणि जातात; पण काही खेळाडूंची महती सीमा ओलांडतात. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी किती विक्रम केले, यापेक्षा त्यांचे वर्तन किती तरी पटीने महान आहे. म्हणून त्यांना परदेशातही तेवढाच मान मिळतो. भारताच्या एका ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डॉन ब्रॅडमन यांचे व्याख्यान देण्याचा मान राहुल द्रविडला देण्यात आला तो काही ऑस्ट्रेलियाकडे कोणी वक्ता नव्हता म्हणून नाही. महेंद्रसिंग धोनीनेही असाच सज्जनतेचा वास्तूपाठ दिला आहे. विराट कोहलीही मैदानावर कितीही आक्रमता दाखवत असला, तरी मैदानाबाहेर समाजात तो समोरच्यांचा तेवढाच आदर ठेवताना दिसतो. त्यानेही "कॉफी'सारखे काही कार्यक्रम केले असतील; पण मर्यादा कधी सोडली नाही. द्रविड, लक्ष्मण, सचिन यांसारख्या राजदुतांमुळे क्रिकेटची लोकप्रियता वाढली त्यांनी ती जपलीही. तुम्हाला ती कायम ठेवण्याची संधी मिळाली होती. आता तुमच्या या बेताल वर्तनाची एवढी दखल घेतली आहे की, येत्या काही सामन्यांतून तुम्हाला वगळण्यात तर आलेच आहे; पण पुढचा विश्वकरंडकही धोक्‍यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

टॅटू, रंगीबेरंगी कपडे आणि विचाराचे भान 
"कॉफी'सारखे हे कार्यक्रम मुळात गॉसिपिंगसाठी प्रसिद्ध असतात. काही तरी मसाला या कार्यक्रमाचा होस्ट पाहुण्यांकडून काढून घेत असतो. म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला याचे भान खेळाडूंना तरी असायलाच हवे. कारण जेव्हा तुम्ही मैदानात कर्तृत्व गाजवत असता, तेव्हा तुम्हाला काही जण आयडॉल मानून स्फूर्ती घेत असतात. कपिलदेव यांच्याकडे पाहून सचिनने स्फूर्ती घेतली. सचिनकडे पाहून विराटसारखे असंख्य तरुण तयार झाले. अंगावर टॅटू काढणे, रंगीबेरंगी कपडे घालणे हा वैयक्तिक जीवनशैलीचा भाग झाला; पण कार्यक्रमात बोलताना विचारांचे भान असणे आवश्‍यकच आहे. 

परवानगी कोणी दिली 
जेव्हा एखाद्या खेळाडूची संघात निवड होते, तेव्हा तो दौरा पूर्ण झाल्यानंतर पुढे काही दिवस तरी प्रसिद्धीमाध्यमांशी आणि कार्यक्रमात जाण्याबाबत आचारसंहिता असते. भारतीय संघ सातत्याने खेळत असल्यामुळे ही आचारसंहिता बाराही महिने असते; पण एखाद्या स्वागत समारंभ किंवा गौरव कार्यक्रमात खेळाडूला जायचे असेल, तर कर्णधार किंवा प्रशिक्षकाची अथवा बीबीसीआयची परवानगी घेणे बंधनकारक असते. पण, हार्दिक पंड्या आणि राहुल यांना "कॉफी'सारख्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात जायची परवानगी कोणी दिली, हा प्रश्न आहे. आणि कोणाचीही परवानगी न घेता हे खेळाडू तेथे गेले असतील, तर त्यांच्यावर मोठी कारवाई होणे आवश्‍यक आहे. 

पंड्याला आता होईल कॉफीची ऍलर्जी 
हे कॉफी विथ करण प्रकरण हार्दिक पंड्याला चांगलेच गरम पडण्याची शक्‍यता आहे. बीसीसीआयकडून कारवाई झाली, तर तो मोठा डाग असेल. त्यामुळे यापुढे पंड्या साधी कॉफी पितानाही चारवेळा विचार करेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT