Weightlifting 
क्रीडा

सतीश, वेंकटमुळे ‘सुवर्णलिफ्टिंग’

सकाळवृत्तसेवा

राष्ट्रीय स्पर्धेतील दुखापतीनंतरही सतीश शिवालिंगमने जिद्द सोडली नाही आणि राष्ट्रकुल क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेतील भारताचे तिसरे सुवर्णपदक जिंकले. गतविजेत्या सतीशने अन्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पाच किलो वजन जास्त उचलून सहज बाजी मारली. 

सतीशच्या यशासोबत सहज बाजी हे शब्द जोडणे चुकीचे होईल. त्याने ७७ किलो गटातील यशाची आशा राष्ट्रीय स्पर्धेतील दुखापतीनंतर सोडली होती. त्याला साधे बसतानाही त्रास होत होता. पण या २५ वर्षीय जिद्दी युवकाने एकंदरीत ३१७ किलो (स्नॅचमध्ये १४४, क्‍लीन अँड जर्क १७३) वजन पेलताना हुकमत राखली. तो क्‍लीन अँड जर्कमध्ये शेवटचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्याचे सुवर्णपदक निश्‍चित झाले असते. अजून एखादा प्रयत्न केला असता तर खूपच त्रास झाला असता, असे त्याने सांगितले. 

राष्ट्रीय  स्पर्धेत क्‍लीन अँड जर्कमध्ये १९४ किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली. अजूनही त्रास होत आहे, तरीही सुवर्णपदक जिंकू शकलो, याचा आनंद आहे, असे सतीशने सांगितले. 

दुखापत झाल्यावर तर साधे बसणेही अवघड झाले होते. त्यावेळी सर्वांनी काळजी घेतली. माझा आत्मविश्‍वास उंचावला. पण तरीही मला खात्री नव्हती. त्यामुळे मी पूर्ण जोषात सरावही केला नव्हता, या परिस्थितीत पदकाची आशा तरी कशी बाळगणार, अशी विचारणा त्याने केली. 

स्नॅचमध्ये सतीश आणि इंग्लंडचा जॅक ओलिव्हर यांच्यात चांगलीच चुरस झाली. दोघांनीही वजन वाढवत नेले, त्यात जॅक एका किलोने सरस ठरला. क्‍लीन अँड जर्कमध्ये १६७ किलोने यशस्वी सुरवात केल्यानंतरच्या दोन प्रयत्नांत जॅक १७१ किलो वजन उचलू शकला नाही. त्यामुळे सतीशने दुसऱ्या प्रयत्नात पेललेल्या १७३ किलोंनी त्याचे सुवर्णपदक निश्‍चित केले. मी एक प्रकारे लकीच ठरलो. तो एका जरी प्रयत्नात यशस्वी झाला असता तर माझे आव्हान खडतर झाले असते. शरीराने किती साथ दिली असती हा प्रश्‍नच आहे, असे सतीश म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे अन् बालिश चाळे...; शिंदे खासदाराची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

IND vs ENG 5th Test: ८ वर्षांनी संधी मिळाली, पण Karun Nair ने माती केली! कसोटी कारकीर्द संपल्यात जमा, कारण...

Latest Maharashtra News Updates Live: रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

SCROLL FOR NEXT