Pakistan Fan Who Sold His Tractor For 3000 USD To Get IND vs PAK T20 WC sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Pakistan Fan : 'ट्रॅक्टर विकून मॅच पाहायला आलो पण लाज वाटली...' Ind vs Pak सामन्यानंतर चाहत्याचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

दरम्यान या सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्याचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे.

Kiran Mahanavar

India beat Pakistan T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. या सामन्याची क्रेझ मैदानापासून मैदानाबाहेर दिसून येत आहे. 9 जून रोजी दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले. ज्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पुन्हा पराभव केला.

पाकिस्तान संघासाठी हा वर्ल्ड कप आतापर्यंत दुःस्वप्नापेक्षा कमी राहिला नाही. पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर आता भारताविरुद्धचा सामनाही हरला आहे. त्यामुळे त्याच्यावर आता टी-20 वर्ल्ड कपधून बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान या सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्याचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या मॅचसाठी एक पाकिस्तानी चाहता आपला ट्रॅक्टर विकून सामना पाहण्यासाठी आला होता. पण जेव्हा संघ हरला तेव्हा तो खूपच नाराज दिसला.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी मी ट्रॅक्टर तीन हजार डॉलरला विकला होता. जेव्हा मी भारताची धावसंख्या पाहिली तेव्हा असे वाटले की विजय आपलाच आहे. परंतु भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. सामन्यानंतर त्या व्यक्तीने पाकिस्तानला अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला.

भारताने रविवारी 119 धावांच्या स्कोअरचा बचाव करत पाकिस्तानला दणदणीत पराभव दिला. यासह भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह त्यांचे चार गुण आहेत. त्याचबरोबर भारताचा नेट रन रेटही 1.455 झाला आहे.

याशिवाय चालू स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बाबर आझमच्या संघाला अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडता आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

SCROLL FOR NEXT