Champions Cricket League T20
Champions Cricket League T20  sakal
क्रिकेट

Champions Cricket League T20 : चॅम्पियन्स क्रिकेट लीग टी-२० पुन्हा सुरू होणार? ; भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड मंडळाकडून पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तब्बल १० वर्षांनंतर आता चॅम्पियन्स लीग टी-२० ही क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन प्रमुख क्रिकेट मंडळांकडून ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. याबाबतची बोलणी सुरू आहेत.

चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचा श्रीगणेशा २००८मध्ये झाला. मात्र, मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पहिल्या वर्षी ही स्पर्धा होऊ शकली नाही. २००९ ते २०१४ या दरम्यान सहा वेळा ही स्पर्धा पार पडली. चेन्नई सुपरकिंग्स व मुंबई इंडियन्स या भारतातील संघांनी प्रत्येकी दोन वेळा या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहर उमटवली. न्यू साऊथ वेल्स ब्लू व सिडनी सिक्सर्स या दोन ऑस्ट्रेलियातील संघांनी प्रत्येकी एक वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. चेन्नई सुपरकिंग्सने २०१४मध्ये चॅम्पियन्स लीगच्या अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. त्यानंतर मात्र ही स्पर्धा होऊ शकली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाचा या स्पर्धेवर परिणाम झाला. आता पुन्हा ही स्पर्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

स्पर्धेसमोर आव्हान

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मालिका मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेसाठी जागा मिळणे कठीण आहे; पण भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन क्रिकेट मंडळांकडून ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. या तीनही मंडळांमध्ये चर्चा सुरू आहे, अशी माहिती क्रिकेट व्हिक्टोरियाचे विशेष कार्यकारी अधिकारी निक कमिन्स यांनी दिली.

फुटबॉलच्या पार्श्वभूमीवर

निक कमिन्स पुढे म्हणाले, फुटबॉल या खेळामध्ये विश्‍वकरंडकासोबतच चॅम्पियन्स लीगलाही उदंड प्रतिसाद लाभत आहे. आता क्रिकेट हा खेळही त्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. मुंबई इंडियन्स- मेलबर्न स्टार्स ही लढत मेलबर्नमधील ऐतिहासिक स्टेडियमवर पार पडल्यास भारतीय खेळाडूंचा खेळ ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमींना याचि देही याचि डोळा पाहता येईल. ही मेजवानी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT