T20 World Cup 2024 esakal
Cricket

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप जिंकणे सोडा, टीम इंडिया सेमीफायनलही नाही खेळणार; 'या' 4 संघांमध्ये होणार टक्कर?

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Michael Vaughan Prediction : भारतासह अनेक देशांनी 1 जूनपासून वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी आपल्या संघाची घोषणा केली. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या तगड्या संघांनी आपला संघ जाहीर केला आहे. दरम्यान, कोणाचा संघ किती मजबूत अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच स्पर्धेत कोण सेमी फायनल गाठणार याचे देखील अंदाज वर्तवले जात आहेत.

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने आपला अंदाज वर्तवला आहे. मायकल वॉनने वर्ल्डकपमध्ये कोणते चार संघ हे सेमी फायनलिस्ट असतील याचा अंदाज वर्तवला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चार संघात त्यानं भारताचा समावेश केलेलाच नाही.

मायकल वॉनने ट्विट केले की, 'टी 20 वर्ल्डकपमधील माझे चार सेमी फायनलिस्ट... इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज.'

टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जायसवाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान

भारताचं वेळापत्रक :

5 जून - भारत विरूद्ध आयर्लंड

9 जून - भारत विरूद्ध पाकिस्तान

12 जून - भारत विरूद्ध युएसए

15 जून - भारत विरूद्ध कॅनडा

(Cricket Marathi New)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT