T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट

T20 World Cup 2024 : वर्ल्डकपसाठी अशी असणार खेळपट्टी... दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आयपीमधील खेळपट्ट्या फलंदाजीस फारच पोषक आहेत; पण विंडीजआणि अमेरिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी असणाऱ्या खेळपट्ट्या संथ असतील, त्यामुळे डाव सावरणाऱ्या खेळाडूंचे महत्त्व अधिक असेल, असे मत डेव्हिड वॉर्नरने मांडले.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या संथ तर असतीलच; पण फिरकीसही काही प्रमाणात साथ देणाऱ्या असतील, त्यामुळे आयपीएलमध्ये होत असलेली फटकेबाजी तेथे होणार नाही. कॅरेबियन लीगमुळे मी तेथे बरेच क्रिकेट खेळलो आहे, असे वॉर्नरने सांगितले.

२०१० मध्येही आम्ही तेथे विश्वकरंडक स्पर्धा खेळलो तेव्हाही भरभरून धावा होतील, अशा खेळपट्ट्या नव्हत्या. त्यामुळे डाव उभारणारा खेळाडू माईक हसी याचा आम्हाला त्यावेळी उपयोग झाला होता, असे वॉर्नर म्हणाला. त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत या दोन्ही ठिकाणी होणारे सामने सूर्यप्रकाशात (डे गेम) होणार आहेत, त्यामुळे खेळपट्टी रफ होईल आणि चेंडू वळू लागतील, हा महत्त्वाचा फरक असणार आहे, असा मुद्दाही वॉर्नरने मांडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT