Rohit Sharma - Shubman Gill | India vs Sri Lanka 1st ODI Sakal
Cricket

IND vs SL ODI: विजय ना भारताचा, ना श्रीलंकेचा! पहिल्या वनडेत बरोबरी

India vs Sri Lanka 1st ODI Match: श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला.

Pranali Kodre

India vs Sri Lanka 1st ODI Match Result: श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२ ऑगस्ट) पार पडला. हा सामना बरोबरीत सुटला.

या सामन्यात श्रीलंकेने भारताला २३१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतालाही ४७.५ षटकात सर्वबाद २३० धावाच करता आल्याने सामना बरोबरीत सुटला.

या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल उतरले होते. त्यांनी सुरुवातही चांगली दिली. रोहितने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र त्यांच्यातील ७५ धावांची भागीदारी दुनिथ वेल्लालागेने तोडली. त्याने शुभमन गिलला १६ धावांवर १३ व्या षटकात बाद केले.

दरम्यान, रोहितने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला त्यानंतर लगेचच वेल्लालागेनेच १५ व्या षटकात पायचीत पकडले. त्यामुळे रोहितला ४७ चेंडूत ५८ धावा करून माघारी परतावे लागले. पुढच्याच षटकात अकिला धनंजयाने वॉशिंग्टन सुंदरला ५ धावावर पायचीत केले.

यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत भारताला १३० धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र २४ व्या षटकात वनिंदू हसरंगाने विराटला २४ धावांवर पायचीत करत माघारी धाडलं, तर पुढच्याच षटकात असिथा फर्नांडोने श्रेयस अय्यरला २३ धावांवर त्रिफळाचीत केले.

त्यामुळे भारतीय संघ २५ षटकांच्या आतच ५ विकेट्स गमावल्याने अडचणीत सापडला होता. पण यावेळी केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी ५७ धावांची भागीदारी केली आणि भारताच्या आशा उंचावल्या.

मात्र, ४० व्या षटकात केएल राहुलला वनिंदू हसरंगाने दुनिथ वेल्लालागेच्या हातून ३१ धावावर बाद केलं आणि सामन्यात रोमांच आणला. त्यातच ४१ व्या षटकात कर्णधार चरिथ असलंकाने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या अक्षर पटेललाही ३३ धावांवर बाद करत पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर हसरंगाने ४५ व्या षटकात कुलदीप यादवलाही बाद केलं. पण शिवम दुबे फलंदाजी करत असल्याने भारताच्या आशा कायम होत्या.

परंतु, विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज असताना ४८ व्या षटकात दुबेला असलंकाने २५ धावांवर बाद केले, त्याच्या पुढच्याच चेंडूवर अर्शदीप सिंगही पायचीत झाल्याने भारताचा डाव संपला आणि सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात सुपर ओव्हर नसल्याने निकालही बरोबरीचा लागला.

श्रीलंकेकडून श्रीलंकेकडून चरिथ असलंका आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर दुनिथ वेल्लालागेने २ विकेट्स घेतल्या आणि असिथा फर्नांडोने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेला ५० षटकात ८ बाद २३० धावांवर रोखले होते. भारताने सुरुवातीलाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेला २५ षटकापर्यंत १०० धावाही पार करता आल्या नव्हत्या.

पण एका बाजूने निसंकाने झुंज देत ५६ धावांची खेळी केली होती. तो बाद झाल्यानंतर दुनिथ वेल्लालागेने फलंदाजीजी जबाबदारी घेतली. त्याला नंतर वनिंदू हसरंगा (२४) आणि अकिला धनंजयाने (१७) यांनी छोटेखानी खेळी करत साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेला २३० धावांपर्यंत पोहचला आले. वेल्लालागे ६५ चेंडूत ६७ धावा करून नाबाद राहिला.

भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT