IPL 2026 may begin on March 28 instead of March 26
esakal
Why IPL 2026 start date is postponed? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आयपीएल २०२६ ची सुरूवात दोन दिवसाच्या विलंबाने करण्याची शक्यता बळावली आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी आयपीएल २०२६ ला २८ मार्च किंवा २९ मार्चपासून सुरूवात होणार आहे. येत्या आठवड्यात याबाबतची घोषणा करण्यात येईल.