Champions Trophy India Vs Pakistan  esakal
Cricket

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? मोठी अपडेट आली समोर

अनिरुद्ध संकपाळ

Champions Trophy 2025 : भारतीय संघाने आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2024 चे विजेतेपद मिळवल्यानंतर आता सर्वांना पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेध लागले आहेत. मात्र ही चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होत असल्याने भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भारताने अजून आपल्या समावेशाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

नुकतेच पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आजतकने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा भारत सरकारच घेणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा ड्राफ्ट आयसीसीला सादर केला आहे. या ड्राफ्टनुसार भारताचे सर्व सामने लाहोर येथे आयोजित केले जाणार आहेत.

याबाबत एका सूत्राने सांगितले की, 'सध्या तरी आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही. मात्र मला वाटतं की भारतीय संघ पाकिस्तानात जाईल याची शक्यता फार कमी आहे. मात्र याबाबतचा शेवटचा निर्णय हा भारत सरकारचा असणार आहे. याबाबत या महिन्यात श्रीलंकेत आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीत पीसीबी हा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे.'

सूत्र पुढे म्हणाला की, 'अजून याबाबत आम्ही चर्चा केलेली नाही. सरकार जो काही निर्णय घेईल त्याचे आम्हाला पालन करावं लागणार आहे. ही आयसीसीची स्पर्धा आहे. त्यामुळे याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. पुढच्या आयसीसी बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते. त्यावेळीच याबाबत काही माहिती समोर येईल.'

गेल्यावेळीचा आशिया कप देखील पाकिस्तानातच होता मात्र भारताने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतल्याने हायब्रीड मॉडेलचा अवलंब केला गेला होता. भारताचे सर्व सामने आणि बाद फेरी श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

EPFO Provident Fund : घरबसल्या 1 मिनिटात तपासा आपला PF बॅलन्स! जाणून घ्या EPFO पासबुक पाहण्याचे सोपे, जलद मार्ग आणि नवीन सुविधा

Mumbai-Nashik: मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग ४ महिने बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

IND vs SA 4th T20I : शुभमन गिल OUT, तीन खेळाडूंची एन्ट्री? चौथ्या ट्वेंटी-२० साठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल

Latur Crime : हातपाय बांधून जिवंत जाळलं! चार तास जळत राहिली कार, तडफडून तडफडून तरुणाचा अंत; अनैतिक संबंधातून क्रूर कृत्य?

SCROLL FOR NEXT