Venkatesh Iyer sakal
Cricket

गंभीरचा पठ्ठ्या बनणार इंग्लिशमन, 2 वर्षांपासून टीम इंडियामध्ये संधी न मिळाल्याने घेतला मोठा निर्णय!

आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळून 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही हा खेळाडू संघात पुनरागमन करू शकला नाही. अशा परिस्थितीत या खेळाडूने आता आपल्या करिअरसाठी मोठा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू लवकरच इंग्लंडमध्ये खेळताना दिसणार आहे.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. व्यंकटेश अय्यर या वर्षीचा एकदिवसीय कप आणि दोन काउंटी चॅम्पियनशिप सामने लँकेशायरकडून खेळणार आहे.

लँकेशायरने भारतीय खेळाडूसोबत पाच आठवड्यांसाठी करार केला आहे. वेंकटेश कौंटी क्रिकेटचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वेंकटेशसाठी आयपीएलचे मागील 2 सीझन खूप चांगले गेले. आयपीएल 2024 मध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्ससाठी एकूण 370 धावा केल्या.

व्यंकटेश अय्यरला 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी हार्दिक पांड्या जखमी झाला होता. व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 2 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये 24 आणि टी-20 मध्ये 133 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 5 विकेट्सही घेतल्या आहेत. वेंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी शेवटचा सामना फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

Black Magic Incident : मंचर स्मशानभूमीत जादूटोण्याचा संशय; अंधश्रद्धेचे काळे सावट कायम

Nicolas Sarkozy: फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझींना ५ वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय? वाचा...

SCROLL FOR NEXT