ZIM vs IND 1st T20 Playing 11 esakal
Cricket

ZIM vs IND 1st T20 Playing 11 : शुभमन गिल मित्राला संधी देणार; सीएसकेचा कर्णधार ऋतुराजला बसावं लागणार बेंचवर?

अनिरुद्ध संकपाळ

ZIM vs IND 1st T20 Playing 11 : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये टी-२० विश्‍वकरंडक पटकावला. या देदीप्यमान यशानंतर रोहित शर्मा व विराट कोहली या महान क्रिकेटपटूंनी टी-२० प्रकारामधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आता टी-२० विश्‍वविजेता म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघ उद्या पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेशी दोन हात करणार आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियाच्या संघात युवा खेळाडूंचा अन्‌ आयपीएलमध्ये चमक दाखवलेल्या खेळाडूंचा भरणा अधिक आहे. भारतीय टी-२० संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात उद्यापासून (ता. ६) होईल असे याप्रसंगी म्हणायला हरकत नाही.

भारत - झिम्बाब्वे टी-२० मालिका

  • पहिला सामना - ६ जुलै

  • दुसरा सामना - ७ जुलै

  • तिसरा सामना - १० जुलै

  • चौथा सामना - १३ जुलै

  • पाचवा सामना - १४ जुलै

(पाचही सामने हरारे येथे होतील.)

रोहित शर्मा व विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंची पोकळी भरून काढणे सोपे नाही, पण निवृत्ती हा खेळाचाच एक भाग आहे. प्रत्येक खेळाडूला निवृत्त व्हावे लागते. वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या निवृत्तीनंतर नव्या अन्‌ युवा खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारी येते.

अशाच प्रकारची जबाबदारी अभिषेक शर्मा व रियान पराग या दोन खेळाडूंच्या खांद्यावर पडणार आहे. या दोनही खेळाडूंनी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत या दोनही खेळाडूंना अंतिम अकरामध्ये संधी मिळणार, हे निश्‍चित आहे.

सलामीला कोण येणार?

झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या लढतीत कर्णधार शुभमन गिलसोबत कोणता फलंदाज सलामीला येईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे. अभिषेक शर्मा व ॠतुराज गायकवाड यांच्यापैकी एक खेळाडू गिलसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. अभिषेक डावखुरा फलंदाज असल्यामुळे त्यालाच सलामीसाठी अधिक पसंती असेल. अशावेळी ॠतुराज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. रियान पराग चौथ्या अन्‌ रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल.

यष्टिरक्षणासाठी चुरस

संजू सॅमसन, शिवम दुबे व यशस्वी जयस्वाल हे तीनही खेळाडू मायदेशात असून तिसऱ्या लढतीसाठी ते भारतीय संघाशी जोडले जाणार आहेत. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल व जितेश शर्मा यांच्यामध्ये यष्टिरक्षणासाठी चुरस असणार आहे.

रवी बिश्‍नोई प्रत्येक सामन्यात खेळणार

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदर व रवी बिश्‍नोई या फिरकीपटूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. लेगस्पिनर रवी बिश्‍नोई प्रत्येक लढतीत खेळण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाजी विभागात चुरस असण्याची शक्यता आहे. आवेश खान व खलील अहमद या वेगवान गोलंदाजांसह मुकेश कुमार याची निवड होण्याची शक्यता आहे. हर्षित राणाला बेंचवर बसावे लागण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 :

शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंह, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिममध्ये शिवसेनेत बंडखोरी; जाणावळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT