क्रीडा

इस्तोमिनच्या माघारीचा भारतीय संघाला दिलासा

सकाळवृत्तसेवा

दुहेरीच्या जोडीबाबत कर्णधार भूपतीचे मौन कायम
बंगळूर - आशिया-ओशियाना गटातील डेव्हिस करंडक लढतीतून उझबेकिस्तानचा स्टार खेळाडू डेनिस इस्तोमिन याने माघार घेतली आहे. येत्या शनिवारपासून (ता. 8) सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या लढतीत उझबेकिस्तानसाठी हा धक्का असला, तरी यजमान भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे.

जागतिक क्रमवारीत 71व्या स्थानावर असणाऱ्या इस्तोमिनचे खरे आव्हान भारतासमोर मानले जात होते. त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत नोव्हाक जोकोविच याचा पराभव केला होता. अखेरपर्यंत इस्तोमिन खेळणार असेच मानले जात होते. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे त्याला अखेर माघार घ्यावी लागली. डॉक्‍टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता उझबेकिस्तानचे कर्णधार पेट लिबेड एकेरीसाठी सांजर फैझिएव आणि तेमुर इस्मालिओव यांची निवड करण्याची शक्‍यता आहे.

या लढतीसाठी भारताचा कर्णधार महेश भूपती याने आधीच केवळ एकेरीतील खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. प्रतिस्पर्धी संघात इस्तोमिनसारखा स्टार खेळाडू असल्यामुळे किमान दुहेरीची जोडी भक्कम असावी असे मानले जात होते. मात्र, भूपतीने पेस आणि बोपण्णा दोघांनाही राखीव खेळाडूंत स्थान देऊन सर्वांनाच धक्का दिला होता.

भूपतीचे अजूनही मौनच
भारतीय संघाचे सराव शिबिर येथे सुरू असून, राखीव खेळाडूमधील लिएँडर पेस मंगळवारी रात्री येथे दाखल झाला असून, बोपण्णा अजूनही बंगळूरमध्ये पोचलेला नाही. तो येण्याविषयीदेखील कुणाला माहिती नाही. पेसने रामकुमारच्या साथीत जोडी जमवून सराव केला. प्रज्ञेश गुणेश्‍वरन-एन. श्रीराम बालाजी यांनी त्यांना सराव दिला. रामकुमार रामनाथन एकेरीची पहिली लढत खेळणार हे निश्‍चित आहे. युकीने माघार घेतल्यामुळे प्रज्ञेश आणि बालाजी यांना पदार्पणाची संधी मिळेल.
यानंतरही प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्त्व सांभाळणाऱ्या महेश भूपतीने भारताच्या दुहेरीच्या जोडीविषयी मौन बाळगले. दुहेरीची लढत खेळणाऱ्या भारतीय जोडीचे नाव त्यामुळे अजूनही गुलदस्तातच राहिले आहे. लढतीच्या दिवशी पहिली एकेरीची लढत सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी आपण दुहेरीतील जोडीचे नाव जाहीर करू असे भूपतीने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT