Ashes-2019
Ashes-2019 
क्रीडा

Ashes 2019 : हेजलवूडच्या माऱ्यासमोर इंग्लंड अवघ्या 67 धावांत गारद

वृत्तसंस्था

ऍशेस कसोटी​ : लीड्‌स : तिसऱ्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 67 धावांत खुर्दा उडविला. पहिल्या दिवशी 112 धावांच्या भक्कम आघाडीनंतर ऑस्ट्रेलियाने 179 पर्यंत मजल मारली. जोफ्रा आर्चरने अर्धा डझन विकेट घेत आपली जबाबदारी पार पाडली होती, पण आज (शुक्रवार) दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज निरुत्तर झाले. 

यजमान कर्णधार ज्यो रूट याला तर भोपळासुद्धा फोडता आला नाही. वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड याने त्याला बाद केले. हेझलवूडने 30 धावांत निम्मा संघ गारद केला. कमिन्स व पॅट्टीन्सन यांनी अनुक्रमे तीन व दोन विकेट घेत त्याला बहुमोल साथ दिली, तर डेव्हिड वॉर्नरने चार झेल घेतले. 

पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययात ऑस्ट्रेलियाचा डाव 179 धावांत संपला होता. पहिली कसोटी गमावल्यामुळे पिछाडीवर असलेल्या इंग्लंडकडून भक्कम फलंदाजीची अपेक्षा होती, प्रत्यक्षात लीड्‌स मैदानावर त्यांची घसरगुंडी उडाली. ज्यो डेन्ली याने चौथ्या क्रमांकावर केलेल्या 12 धावा सर्वाधिक ठरल्या. डबल फिगरमध्ये गेलेला तो एकमेव फलंदाज ठरला. 28व्या षटकात इंग्लंडचा डाव आटोपला. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया : 52.1 षटकांत सर्व बाद 179 (डेव्हिड वॉर्नर 61-94 चेंडू, 7 चौकार, उस्मान ख्वाजा 8, मॅर्नस लाबूशेन 74-129 चेंडू, 10 चौकार, टीम पेन 11, स्टुअर्ट ब्रॉड 14-4-32-2, जोफ्रा आर्चर 17.1-3-45-6) विरुद्ध इंग्लंड : 27.5 षटकांत सर्व बाद 67 (रॉरी बर्न्स 9, जेसन रॉय 9, ज्यो रूट 0, ज्यो डेन्ली 12, बेन स्टोक्‍स 8, आर्चर 7, ब्रॉड नाबाद 4, पॅट कमिन्स 9-4-23-3, जॉश हेझलवूड 12.5-2-30-5, जॅम्स पॅट्टीन्सन 5-2-9-2) 

दृष्टिक्षेपात :
- 67 किंवा कमी धावांत ऍशेसमध्ये डाव संपण्याची इंग्लंडवर 71 वर्षांनी नामुष्की 
- याआधी 1948 मध्ये ओव्हलवर हे घडले, त्या वेळी 52 धावांत खुर्दा 
- ती डॉन ब्रॅडमन यांच्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी 
- त्या वेळी रे लॅंडवॉलच्या 20 धावांत सहा विकेट 
- लिड्‌सवरील यापूर्वीची नीचांकी धावसंख्या इंग्लंडचीच 
- 1909 मध्ये 87 धावांत गारद 
- मायदेशात इंग्लंडची चौथ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या 
- 1948 मध्ये 52, त्यानंतर त्याच वर्षी लॉर्डसवर अनुक्रमे 53 व 62 
- यंदा तिसऱ्यांदा इंग्लंड संघ 90 पेक्षा कमी धावांत गारद 
- जानेवारीत ब्रिजटाऊनला विंडीजविरुद्ध 77 
- जुलैमध्ये लॉर्डसवर आयर्लंडविरुद्ध 85 
- जॉश हेझलवूडने ज्यो रुटला सहाव्यांदा टिपले 
- पूर्ण झालेल्या डावात ज्यो डेन्लीची 12 धावसंख्या नीचांकी 
- यापूर्वी सिडनी कसोटीत 1902 मध्ये गिल्बर्ट जोसेप व विली क्‍युऐफ यांच्या प्रत्येकी 15 धावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT