England move ahead ... Sweden beat 2-0
England move ahead ... Sweden beat 2-0 
क्रीडा

इंग्लंडचे पाऊल पडते पुढे; स्वीडनवर 2-0 ने मात

सकाळवृत्तसेवा

सामरा : प्रत्येक सामन्यागणिक कामगिरीत सुधारणा आणि प्रगती करणाऱ्या इंग्लंडने रशियात आल्यानंतर एक परिपूर्ण विजय मिळवला. एरवी त्यांना डोकेदुखी ठरणाऱ्या स्वीडनचा 2-0 असा पराभव करून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 

1966 आणि 1990 अशा दोन स्पर्धांमध्ये इंग्लंडने उपांत्य फेरी गाठलेली आहे. आता तिसऱ्यांदा हा बहुमान मिळवताना त्यांच्या हॅरी मागुरे आणि डेल अली यांनी केलेले गोल मोलाचे ठरले; परंतु तेवढाच मौल्यवान पिकफोर्ड हा त्यांचा गोलरक्षकही ठरला. गोलजाळ्यात जाणारे त्याने अडवलेले तीन फटके केवळ लाजवाब होते. तोच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना रशिया आणि क्रोएशिया यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. 

उपांत्य फेरीतील या विजयामुळे आता इंग्लंडसाठी विजेतेपदाची पसंती वाढली आहे. 30 व्या मिनिटाला मागुरेने हेडरवर गोल करेपर्यंत इंग्लंडचा खेळ काहीसा विस्कळित होता. चुकीचे आणि कमजोर पास स्वीडनचा आत्मविश्‍वास वाढवणारे होते. या स्पर्धेत स्वीडनने केवळ जर्मनीविरुद्ध दोन गोल स्वीकारले होते. त्यामुळे इंग्लंडलाही ते सहजासहजी गोल करू देणार नाही, अशी त्यांची सुरुवात होती; पण 30 व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर मागुरेने हेडरवर गोल केला आणि बघता बघता सामन्याचे चित्र बदलत गेले. या गोलात ऍशले यंगने कॉर्नवर मारलेली किक अचूक होती. या गोलामुळे विस्कळित खेळ करणाऱ्या इंग्लंडचा आत्मविश्‍वास वाढला आणि खेळात सुसूत्रताही आली. 

कर्णधार हॅरी केन हा इंग्लंडचा हिरो म्हणून पुढे आला आहे. गोल्डन बूटसाठी तो आघाडीवर असून, आतापर्यंत सहा गोल केले आहेत; पण आकडेवारीचा विचार करता स्वीडनच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सहा गोल केले होते. हॅरी केनवर सर्वांचे लक्ष केंद्रित असताना इंग्लंडसाठी नवा हिरो म्हणून गोलरक्षक पिकफोर्ड पुढे आला आहे. कोलंबियाविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पेनल्टी शूटआउटवरही तो हिरो ठरला होता. 

मध्यंतरानंतर डेल अलीने इंग्लंडची आघाडी 58 व्या मिनिटाला 2-0 अशी वाढवली; पण त्यानंतर पिकफोर्ड विरुद्ध स्वीडन अशी चकमक पाहायला मिळाली. स्वीडनकडून होणारे हमखास तीन गोल त्याने रोखले आणि 1994 नंतर पुन्हा उपांत्य फेरी गाठण्याचे स्वीडनचे स्वप्न हवेत विरले. 

 डेल अली इंग्लंडकडून गोल करणारा दुसरा सर्वांत लहान (22 वर्षे 87 दिवस) खेळाडू. मायकेल ओवेनचा (18 वर्षे 190 दिवस) विक्रम कायम, त्याने 1998 च्या स्पर्धेत रुमानियाविरुद्ध ही कामगिरी केली होती. 
- विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक आठ गोलांची इंग्लंडकडून बरोबरी. 1966 च्या स्पर्धेत पोर्तुगालनेही आठ गोल केले होते. 
- स्वीडनविरुद्ध इंग्लंडकडून करण्यात आलेल्या 11 पैकी सहा गोल हेडवर करण्यात आले आहेत. प्रत्येक वेळी वेगवेगळे खेळाडू आहेत. 
- स्वीडन आणि इंग्लंड यांच्यात एकूण 25 वी आणि वर्ल्ड कपमधील तिसरी लढत. 
- अगोदरच्या 24 पैकी स्वीडनने सात, इंग्लंडने आठ सामने जिंकले होते; तर नऊ बरोबरी होती. 
- इंग्लंडचा ही नववी उपउपांत्य फेरी होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT