CWG22 INDW vs ENGW sakal
क्रीडा

CWG22 INDW vs ENGW : भारतीय संघ इंग्लंडला हरवून पोहचला फायनलमध्ये

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Team) बर्मिंगहम येथे सुरू असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. त्यांनी यजमान इंग्लंडचा 4 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. त्यात भारतीय संघाने फायनल गाठून इतिहास रचला. भारतीय संघाने रौप्य पदक (Silver Medal) निश्चित केले असले तरी त्यांच्याकडून आता सुवर्णाची अपेक्षा असणार आहे.

भारताने इंग्लंडसमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडला 20 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून स्मृती मानधना दमदार खेळी करत 32 चेंडूत 61 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने 44 धावांची झुंजार खेळी करत भारताला 20 षटकात 164 धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर गोलंदाजीत दिप्ती शर्माने 1 तर स्नेह राणाने 2 विकेट घेतल्या. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन फलंदाज धावबाद करत विजयात आपला मोलाचा वाटा उचलला.

अखेरच्या सामन्यात भारताचा विजय

यजमान इंग्लंडला शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची गरज होती. मात्र स्नेह राणाने शेवटच्या षटकात फक्त 9 धावा दिले. भारताने 4 धावांनी सामना जिंकला.

इंग्लंडचा अर्धा डाव संपला; 10 षटकांनंतर 86/3

इंग्लंडचा अर्धा डाव संपला. 10 षटकांनंतर धावसंख्या 86 आहे आणि तीन विकेट पडल्या आहेत.

81/3 : इंग्लंडची तिसरी विकेट पडली

स्नेह राणाने भारताला तिसरे यश मिळवून दिले आहे. इंग्लंडची तिसरी विकेट 81 च्या स्कोअरवर पडली. त्याने 35 धावांवर यॉट क्लीन बोल्ड करून भारताला सामन्यात पुनरागमन मिळवून दिले.

इंग्लंडची दुसरी विकेट पडली

भारताला दुसरी विकेट धावबादच्या रूपाने मिळाली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात कॅप्सी धावबाद झाला. त्याने आठ चेंडूंत १३ धावा केल्या.

इंग्लंडचा डाव सुरु

भारताने दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केली. यजमानांनी पहिल्या दोन षटकात 24 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडसमोर ठेवले 165 धावांचे लक्ष्य

भारताने निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले.

77-2 : भारताला पाठोपाठ दोन धक्के 

भारताला दमदार सुरूवात करून देणाऱ्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा पाठोपाठच्या षटकात बाद झाल्या. स्मृतीला सिव्हरने 61 धावांवर तर शेफाली वर्माला फ्रेया केम्पने 15 धावांवर बाद केले.

स्मृती मानधनानाचे दमदार अर्धशतक

भारताची सलामीवीर स्मृती मानधानाने इंग्लंड विरूद्धच्या सेमी फायनलमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. तिने 23 चेंडूत अर्धशतक ठोकत भारताला पॉवर प्लेमध्ये 64 धावांपर्यंत पोहचवले. दुसऱ्या बाजूने शेफाली वर्माने सावध फलंदाजी करत तिला चांगली साथ दिली.

स्मृती मानधनाची आक्रमक फलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने दमदार सुरूवात केली. सलामीवीर स्मृती मानधनाने आक्रमक फलंदाजी करत भारताला 4 षटकात 40 धावांपर्यंत पोहचवले.

भारताने नाणेफेक जिंकली

भारताने इंग्लंड विरूद्धच्या सेमी फायनलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT