gautam gambhir
gautam gambhir  esakal
क्रीडा

खासदार असुनही IPL मध्ये का काम करतो? गंभीरने दिले सडेतोड उत्तर

धनश्री ओतारी

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर दिल्लीतून लोकसभेचा खासदार आहे. खासदार असून देखील गंभीर क्रिकेटच्या मैदानात समालोचन करताना दिसतो. आयपीएल २०२२मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. लोकप्रतिनिधी असून देखील गंभीर समालोचन करून पैसे कमावतो. त्यामुळे क्रिकेट जगतातून त्याला अनेक सवाल उपस्थित करण्यात आला. सवाल उपस्थित करणाऱ्याला गंभीरने सडेतोड उत्तर दिलं आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. त्याला समालोचन करण्याविषयी प्रश्न विचारला गेला. यावर तो म्हणाला, 'गरिबांसाठी भोजनालय चालवतो, जो त्याचा वैयक्तिक खर्च आहे. या योजनेसाठी खासदार निधीचा वापर करत नाही. अशात जर गरिबांसाठी पैसा खर्च करायचा असेल, तर त्याला काम करावे लागेल. असे सडेतोड उत्तर दिलं.

तसेच, 'एका महिन्यात ५००० लोकांना जेवण देण्यासाठी २५ लाख रूपये लागतात. वर्षाचे झाले २.७५ कोटी रुपये. २५ लाख रुपये मला ती लायब्रेरी बनवण्यासाठी लागले आहेत. हे सर्व खासदार निधीतून बनले नाहीये. खासदार निधीतून ५००० लोकांची चूल पेटत नाही. या लोकांना खाऊ घालण्यासाठी आणि लायब्रेरी बनवण्यासाठी मला काम करणे भाग आहे. मला हे सांगायला कसलीच लाज वाटत नाही की, होय मी समालोचन करतो किंवा आयपीएलमध्ये काम करतो. परंतु यामागे एक खूप मोठे उद्दिष्ट आहे.' अशा शब्दांत हिशोब सांगत सवाल करणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं.

खासदार झाल्यानंतर गंभीरने या सार्वजनिक भोजनालयाला सुरुवात केली होती. याठिकाणी गरिबांसाठी एका रुपयामध्ये जेवण उपलब्ध करून दिले जाते. गंभीरच्या मतदारसंघात ठिकठिकाणी अशा भोजनालयांची सोय केली गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT