T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

T20 World Cup 2024 Warm-up Matches:आयसीसी आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी होणाऱ्या सराव सामन्यांची घोषणा केली आहे.
Team India
Team IndiaSakal

T20 World Cup 2024: जून 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेला आता 15 दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

हे सराव सामने 27 मे ते 1 जून दरम्यान खेळले जाणार आहेत. भारताचा सामना 1 जून रोजी बांग्लादेशविरुद्ध अमेरिकेत होईल. पण अद्याप भारत आणि बांग्लादेश संघात होणाऱ्या सराव सामन्याचा वेळ निश्चित झालेला नाही.

दरम्यान, या स्पर्धेसाठी एकूण 16 सराव सामने खेळवले जाणार आहेत. तसेच एकूण 17 संघ सराव सामने खेळणार आहे, ज्यात दक्षिण आफ्रिकेच्या इंट्रा-स्क्वाड सामन्याचाही समावेश आहे.

Team India
RCB vs CSK Security Breach : आरसीबी-चेन्नई सामन्यात सुरक्षा भेदण्याचं प्लॅनिंग? सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल

हे सराव सामने अमेरिकेतील टेक्सास, फ्लोरिडा आणि वेस्ट इंडिजमधील त्रिनिदाद अँड टेबॅगो या ठिकाणी होणार आहेत. तसेच हे सराव सामने 20-20 षटकांचे असतील, मात्र त्यांना अधिकृत टी२० सामन्याचा दर्जा नसेल. कारण संघांना सर्व 15 खेळाडूंना या सामन्यादरम्यान खेळवण्याची परवानगी असणार आहे.

त्याचबरोबर आयसीसीने असेही स्पष्ट केले की संघ या स्पर्धेसाठी जेव्हा दाखल होणार आहेत, त्यानुसार त्यांना एक की दोन सराव सामने खेळायचे हे निवडण्याची परवानगी होती. त्यामुळे काही संघ दोन, तर काही संघ एक सराव सामना खेळणार आहेत.

तसेच 30 मे रोजी होणारा वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना चाहत्यांनाही पाहाता येणार आहे. त्यासाठी 16 मेपासून तिकीट विक्री सुरू होईल.

Team India
IND vs PAK T20 WC 2024 : भारत-पाकिस्तान सामन्यात पडणार धावांचा पाऊस; खेळपट्टीबाबत क्युरेटरचं मोठं वक्तव्य

असे आहे सराव सामन्यांचे वेळापत्रक

27 मे

 • कॅनडा विरुद्ध नेपाळ, टेक्सास

 • ओमान विरुद्ध पापुओ न्यू गिनी, त्रिनिदाद अँड टोबॅगो

 • नामिबिया विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद अँड टोबॅगो

28 मे

 • श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, फ्लोरिडा

 • बांग्लादेश विरुद्ध अमेरिका, टेक्सास

 • ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो

29 मे

 • दक्षिण आफ्रिका इंट्रा स्क्वाड सामना, फ्लोरिडा

 • अफगाणिस्तान विरुद्ध ओमान, त्रिनिदाद अँड टोबॅगो

30 मे

 • नेपाळ विरुद्ध अमेरिका, टेक्सास

 • स्कॉटलँड विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद अँड टोबॅगो

 • नेदरलँड्स विरुद्ध कॅनडा, टेक्सास

 • नामिबिया विरुद्ध पापुओ न्यू गिनी, त्रिनिदाद अँड टोबॅगो

 • वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो

31 मे

 • आयर्लंड विरुद्ध श्रीलंका, फ्लोरिडा

 • स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान, त्रिनिदाद अँड टोबॅगो

1 जून

 • बांग्लादेश विरुद्ध भारत, अमेरिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com