ICC World Cup Super League
ICC World Cup Super League 
क्रीडा

ICC World Cup Super League टॉप 5 मध्ये पाकिस्तानची एन्ट्री, भारताचं स्थान घसरलं

Kiran Mahanavar

icc world cup super league points table : पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा सलग 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव केला. ज्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत 14 सामने खेळून 8 जिंकले आहेत. पाकिस्तानचे 80 गुण आहेत. भारताचं स्थान घसरलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 8 जिंकले आहेत आणि 4 पराभव पत्करले आहेत. भारत ७९ गुणाने सहाव्या क्रमांकावर आहे.

भारतासाठी आश्चर्याची गोष्टी म्हणजे पाकिस्तान 2 स्थानांनी पुढे गेला आहे. पाकिस्तानला वेस्ट इंडिजसोबत अजून एक वनडे सामना खेळायचा आहे. भारत सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. अशा स्थितीत आयसीसी विश्वचषक सुपर लीग फेरीत भारत पाकिस्तानला मागे टाकू शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बांगलादेशचा संघ आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेशने आत्तापर्यंत 18 सामने खेळले आहेत ज्यात 12 जिंकले आहेत. बांगलादेश संघाचे 120 गुण आहेत. इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने या कालावधीत 15 सामने खेळले असून यादरम्यान त्यांनी 9 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. इंग्लंडचे 95 ​​गुण आहेत. आश्चर्य म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा संघ आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत ज्यात 9 जिंकले आहेत तर 2 हरले आहेत. अफगाणिस्तानचे ९० गुण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT