Team India
Team India  Esak
क्रीडा

IND vs AUS : तो आला अन् गेला...! मालिकेतील शेवटच्या सामन्यातून टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू बाहेर, मोठे कारण आले समोर

Kiran Mahanavar

IND vs AUS 5th T20I Why Deepak Chahar is not playing : बंगळुरू येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारत पुन्हा एकदा प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. दीपक चहर मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात खेळताना दिसणार नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे, याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकदरम्यान दिली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू हेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल. कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, अर्शदीप सिंग या सामन्यात खेळत आहे. दीपक चहर कौटुंबिक कारणांमुळे घरी गेला आहे.

तिसर्‍या सामन्यापूर्वी दीपक चहर संघात सामील झाला होता, कारण मुकेश कुमारने लग्नामुळे एका सामन्यातून ब्रेक घेतला होता आणि चौथ्या सामन्यात तो परतला होता. तर दीपक चहर या मालिकेत फक्त एकच सामना खेळला, तो पण चौथा. त्या सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या.

दीपक चहरला जवळपास वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली, परंतु घरी कोणीतरी आजारी असल्यामुळे त्याला संघ सोडावा लागला. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याची टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड झाली आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT