IND vs AUS Hockey
IND vs AUS Hockey sakal
क्रीडा

IND vs AUS Hockey : महिला हॉकीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर ४-२ विजय

सकाळ वृत्तसेवा

अॅडलेड - भारतीय महिला हॉकी संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात निराशाजनक झाली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताचा २-४ असा पराभव झाला.

पहिल्या कॉर्टरमध्ये गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा मिनिटांत दोन गोल केले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या ऐस्लिंग उत्री हिने २१ व्या, तर मॅडी फित्झपॅट्रिकने २७ व्या मिनिटाला गोल केले.

हॉकीमध्ये ‘हॉकीरूझ’ (कांगारु) असे संबोधण्यात येणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या या महिला संघाने तिसऱ्या कॉर्टरमध्ये पाठोपाठ दोन केले. अलिस अर्नाट (३२) आणि कोर्टनी स्कोनेल (३५) यांनी गोल केले. भारताकडून संगीता कुमारीने २९ व्या, तर शर्मिला देवीने ४० व्या मिनिटाला गोल केले.मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर शनिवारी होणार आहे.

भारतीय संघ या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धही दोन सामने खेळणार आहे. हांगझाऊ येथे होणाऱ्या आशिया स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे.अनुभवात भारतीयांपेक्षा पुढे असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सुरुवातीपासून आक्रमण केले. त्यामुळे त्यांना पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले,

दोन्ही वेळा कर्णधार आणि गोलरक्षक असलेल्या सविताने चांगले गोलरक्षण करून संकट टाळले. या दरम्यान भारतालाही एक पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु चेंडू व्यवस्थितपणे न पास करता आल्यामुळे संधी हुकली.

दुसऱ्या क्वार्टरचीही सुरुवात ऑस्ट्रेलियाने आक्रमकपणे केली. संधी तयार केल्या; परंतु दोन्ही वेळा सविता त्यांच्या मार्गात आली. अखेर २१ व्या मिनिटाला सविताचे अभेद्य गोलरक्षण भेदण्यात आले. या पहिल्या गोलामुळे मिळवलेली लय ऑस्ट्रेलियाने कायम ठेवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT