Ind vs Pak Emerging Asia Cup 2023  sakal
क्रीडा

IND vs PAK : ठरलं तर मग! आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान 'या' दिवशी लढणार

सकाळ ऑनलाईन टीम

Ind vs Pak Emerging Asia Cup 2023 : आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या इमर्जिंग आशियाई करंडकाचा श्रीगणेशा १३ जुलैपासून होणार आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. आठ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेमधील भारत अ व पाकिस्तान अ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत १९ जुलै रोजी कोलंबो येथे रंगणार आहे.

आठ देशांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटामध्ये अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, ओमान अ व श्रीलंका अ या देशांचा समावेश असून ‘ब’ गटामध्ये भारत अ, नेपाळ, पाकिस्तान अ आणि अमिराती अ या देशांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या उपांत्य लढती २१ जुलै रोजी होणार असून अजिंक्यपदाची लढत २३ जुलै रोजी रंगणार आहे.

श्रीलंका दोन वेळा विजेते

इमर्जिंग आशियाई क्रिकेट स्पर्धा सर्वप्रथम २०१३ मध्ये खेळवण्यात आली. भारताच्या संघाने पहिल्याच वर्षी अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. त्यानंतर श्रीलंकन संघाने २०१७ व २०१८ मध्ये विजेतेपद पटकावले. २०१९ मध्ये पाकिस्तानने या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. २०१९ नंतर तब्बल चार वर्षांनंतर या स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत करण्यात येत आहे.

स्पर्धेची गटवारी

  • गट अ - अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, ओमान अ, श्रीलंका अ

  • गट ब - भारत अ, नेपाळ, पाकिस्तान अ, अमिराती अ

भारत ‘अ’ संघाच्या लढती

  • १४ जुलै - अमिराती अ

  • १७ जुलै - नेपाळ

  • १९ जुलै - पाकिस्तान अ

आतापर्यंतचे विजेते

  • २०१३ - भारत

  • २०१७ - श्रीलंका

  • २०१८ - श्रीलंका

  • २०१९ - पाकिस्तान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस

Oats-Paneer Dosa: प्रोटीन आणि फायबरचा पॉवरहाऊस! वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये नक्की अॅड करा ओट्स-पनीर डोसा

SCROLL FOR NEXT