India scores 91 runs before lunch in 1st test against south africa  
क्रीडा

INDvsSA : भारताची आक्रमक सुरवात; आफ्रिकेचे गोलंदाज फेल

सुनंदन लेले

विशाखापट्टणम : कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी उपहाराला बिनबाद 91 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली.

नाणेफेकीचा कौल विराट कोहलीच्या बाजूने लागल्यावरच फाफ डु प्लेसिसच्या कपाळावर आठ्यांचे जाळे दिसले. कोहलीने अर्थातच प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. एका बाजूने रबाडा आणि दुसर्‍या बाजूने फिलेंडर असा मारा चालू करून दक्षिण आफ्रिकेने ताज्या खेळपट्टीचा फायदा घ्यायचा माफक प्रयत्न केला. मयांक आगरवाल आणि रोहित शर्मा जोडीने नवा चेंडू आरामात खेळून काढल्यावर 9व्या षटकातच डु प्लेसिसने केशव महाराजची फिरकी गोलंदाजी चालू केली.

एव्हाना जम बसलेल्या रोहित शर्माने मग बेधडक फटकेबाजी केली. फिरकी गोलंदाजांना पुढे सरसावत रोहितने उत्तुंग षटकार मारत अर्धशतक साजरे केले. समोरून मयांक आगरवालने भक्कम फलंदाजी करून गोलंदाजांना यशापासून लांब ठेवले.

हाती असलेल्या पाच गोलंदाजांना गोलंदाजी करायची संधी फाफ डु प्लेसिसने दिली. दोनही भारतीय फलंदाजांनी चांगल्या चेंडूंना मान दिला तर खराब चेंडूंवर चौकार - षटकार मारले. उपहाराला मयांक  आगरवाल (नाबाद 39 धावा)- रोहित शर्मा (नाबाद 52 धावा) फलकावर 91 धावा लावून नाबाद परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT