rohit
rohit  sharma
क्रीडा

रोहितचा शतकी ‘सुपर शो’ ; अफगाणविरुद्ध दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कमालीचा रंगतदार आणि तब्बल दोन सुपर ओव्हर झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव करून तिसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकला. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका अगोदरच खिशात टाकली होती. पूर्ण डावात रोहित शर्माने केलेली नाबाद १२१ धावांची खेळी व्यर्थ जाण्याची स्थिती निर्माण झाली होती, परंतु सुपर ओव्हरमध्ये त्यानेच भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली.

अखंड डावात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २१२ धावा केल्या. अफगाणिस्ताननेही ६ बाद २१२ धावा केल्यामुळे सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर घेण्यात आली त्यामध्येही दोन्ही संघांनी १६ -१६ धावा केल्यामुळे दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली. त्यात भारताला दोन फलंदाज गमावताना केवळ ११ धावाच करता आल्या. मात्र त्या निर्णायक ठरवल्या. रवी बिश्नोईने १ धाव देताना अफगाणचे दोन फलंदाज बाद केले.

रोहितची तीनवेळा फलंदाजी

टी-२० प्रकारात एका फलंदाजाने तीनवेळा फलंदाजी करण्याचा प्रसंग पहिल्यांदा घडला. हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर लागला. अखंड डावात त्याने ६९ चेंडूंत नाबाद १२१ धावा केल्या. त्यांतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये १३ धावा केल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ११ धावा फटकावल्या. अशा पद्धतीने त्याने या सामन्यात एकूण १४५ धावा केल्या.

तत्पूर्वी, ४ बाद २२ अशा दारुण अवस्थेनंतर रोहित आणि रिंकू यांनी भारताचा डाव सावरलाच नाही तर त्याला भक्कम स्थिती निर्माण करून दिली. पण ही धावसंख्या अफगाणच्या फलंदाजांनी संकटात आणली होती. भारताची सुरुवात फारच चिंताजनक होती. पहिले चार फलंदाज २२ धावांत परतले. यात गेल्या सलग दोन सामन्यांत नाबाद अर्धशतके करणाऱ्या शिवम दुबेचाही समावेश होता. विराट कोहली तर पहिल्या चेंडूवर परतला. हे चारही फलंदाज खराब फटका मारताना बाद झाले.

एकीकडे चार फलंदाज पाठोपाठ बाद होत असताना दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा सुरुवातीला अडखळत होता. सहा चेंडूंनंतर त्याने खाते उघडले, पण सूर सापडल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. रिंकू सिंगनेही तेवढीच मोलाची साथ रोहितला दिली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी चौकार-षटकारांचा धुमधडाका लावला त्यामुळे भारताला दोनशे धावांचाा टप्पा पार करता आला. पण अफगाणकडून रेहमतुल्ला गुरबाझ आणि इब्राहिम झादरान यांनी प्रत्येकी ५० धावा केल्या त्यानंतर मोहम्मद नबीने ३४ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : भारत ः२० षटकांत ४ बाद २१२ (यशस्वी जयस्वाल ४, रोहित शर्मा नाबाद १२१ - ६९ चेंडू, ११ चौकार, ८ षटकार, विराट कोहली ०, शिवम दुबे १, रिंकू सिंग नाबाद ६९ - ३९ चेंडू, २ चौकार, ६ षटकार, फरीद अहमद ४-०-२०-३). अफगाणिस्तान ः २० षटकांत ६ बाद २१२ (रेहमतुल्ला गुरबाझ ५० -३२ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार, इब्रााहिम झादरान ५० - ४१ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, मोहम्मद नबी ३४ - १६ चेंडू, २ चौकार, ३ षटकार, वॉशिंग्टन सुंदर ३-०-१८-३)

पहिली सुपर ओव्हर : अफगाणिस्तान १ षटक १ बाद १६ ः भारत १ षटक १ बाद १६

दुसरी सुपर ओव्हर : भारत १ षटक २ बाद ११ः अफगाणिस्तान ३ चेंडूंत २ बाद १.

ट्वेन्टी-२० प्रकारात सर्वाधिक शतके

  • ५ : रोहित शर्मा (भारत)

  • ४ : सुर्यकुमार यादव (भारत)

  • ४ : ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT