India Women Hockey will Play For Bronze medal against New Zealand In Commonwealth Games 2022 esakal
क्रीडा

CWG 2022 : भारतीय महिला हॉकी संघाची ब्राँझपदकासाठी लढत

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहॅम, ता. ६ ः टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक थोडक्यासाठी हुकल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येही नशिबाने साथ दिली नाही. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये निर्धारित वेळेमध्ये १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने ३-० अशा फरकाने विजय संपादन केला. त्यामुळे भारताला महिला हॉकी संघाला आता ब्राँझपदकासाठी लढावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने या लढतीचा सुरुवात चांगली केली. रेबेका ग्रिनर हिने १० व्या मिनिटाला गोल करीत त्यांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारतासाठी वंदना कटारियाने मोलाची कामगिरी बजावली. ४९ व्या मिनिटाला तिने गोल करीत भारतासाठी १-१ अशी बरोबरी साधली. ही बरोबरी ६० मिनिटांच्या खेळानंतरही कायम राहिली.

आता न्यूझीलंडशी सामना

भारतीय महिला हॉकी संघाने २००२ राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक, तर २००६ राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक पटकावले आहे; पण याव्यतिरिक्त भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकता आलेले नाही. १९९८ व २०१८ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय संघासमोर ब्राँझपदकासाठीच्या लढतीत न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया - इंग्लंडमध्ये सुवर्णपदकासाठी लढत रंगणार आहे.

पेनल्टी शूटआऊटवरुन वाद

भारत - ऑस्ट्रेलियामध्ये निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये या लढतीचा निकाल लागला. या वेळी पेनल्टी शूटआऊटमध्ये पहिला शॉट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची रोसी मलोन मैदानात आली. भारताची गोलरक्षक सवीताने तिचे आक्रमण थोपवून लावले. याप्रसंगी मात्र तांत्रिक अधिकारी असलेली इंग्लंडची बी. मॉर्गन हिने टायमर (वेळ) सुरू केला नसल्याचे सांगत ऑस्ट्रेलियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये आणखी एक संधी दिली आणि त्यामध्ये रोसीने गोल केला. याचे पडसाद भारतीय संघावर उमटले. त्यामधून भारतीय संघ उभारलाच नाही. ऑस्ट्रेलियाकडून रोसीनंतर केटलीन नॉब्स व ॲमी लॉटन यांनी गोल केले. भारताकडून लालरेमसियामी, नेहा गोयल व नवनीत कौर यांना अपयश आले. पेनल्टी शूटआऊटवर झालेल्या वादावर भारतीय महिला हॉकी संघाची प्रशिक्षक जानेक शॉपमन, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, माजी हॉकीपटू वीरेन रसकिन्हा यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

SCROLL FOR NEXT