Praggnanandhaa wins title in Norway chess open
Praggnanandhaa wins title in Norway chess open 
क्रीडा

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; प्रज्ञानानंदची विजयी घोडदौड सुरूच

Kiran Mahanavar

Praggnanandhaa wins title in Norway chess open: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. 16 वर्षीय प्रज्ञानंदने शुक्रवारी नॉर्वे बुद्धिबळ अ खुली स्पर्धा जिंकली आहे. आर प्रज्ञानंदने एकूण 9 फेऱ्यांमध्ये 7.5 गुण मिळवून ही कामगिरी केली. शेवटच्या सामन्यात प्रज्ञानंदने आपला देशबांधव व्ही प्रणीतचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे.

प्रज्ञानानंद गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने दुसऱ्यांदा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आणि चेसबल मास्टर्सच्या अंतिम फेरीत चीनच्या डिंग लिरेनकडून पराभव पत्करावा लागला.

चेन्नईचा रहिवासी असलेल्या प्रज्ञानानंदने 2018 मध्ये प्रतिष्ठित ग्रँडमास्टरचे विजेतेपद मिळवले होते. ही कामगिरी करणारा प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात तरुण खेळाडू होता, आणि जगातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू होता. प्रज्ञानंद सर्वात तरुण ग्रँडमास्टर्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने या खेळाडूला मार्गदर्शन केले आहे. ग्रँडमास्टर झाल्यापासून प्रज्ञानंदने सातत्याने प्रगती केली पण त्यानंतर कोविड-19 महामारीमुळे अनेक स्पर्धा थांबल्या होत्या.

प्रज्ञानानंदने वयाच्या 12 वर्षे ग्रँड मास्टरची पदवी संपादन केली आहे. तो भारताचा सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहे. त्याच वेळी 2018 मध्ये तो जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. त्याच्या आधी केवळ युक्रेनचा सर्गेई कर्जाकिन हा 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना खासदार करा, अन्यथा मी... उदयनराजे बीडकरांना टोकाचं बोलले; दोन्ही नेत्यांच्या डोळ्यात अश्रू

Latest Marathi News Live Update: पुढील तीन तासात 'या' जिल्ह्यात विजा, वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

Viral Video: OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? व्हिडिओ होतोय व्हायरल

Cryptocurrency: जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी भारतात येण्याच्या तयारीत; रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार?

25 years of Sarfarosh : आमिर खानला 25 वर्षानंतरही होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप; दिग्दर्शकाने केली पोलखोल

SCROLL FOR NEXT