Indian Premier League 2021
Indian Premier League 2021  
क्रीडा

IPL 2021 : MI ची पराभवाची परंपरा कायम; RCB नं दिली विजयी सलामी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटितटीच्या सामन्यात अखेर किंग कोहलीच्या संघाने बाजी मारली. सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केलीय. मुंबई इंडियन्सने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सने मॅच विनिंग खेळी केली. विराट कोहली (33) आणि ग्लेन मॅक्सवेल (39) धावा केल्या. ही दोघे माघारी फिरल्यानंतर मॅच मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकली होती. मात्र एबीने 27 चेंडूत केलेल्या 48 धावांच्या जोरावर अखेर बंगळुरुला यश मिळाले. 2013 पासून आतापर्यंत सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मुंबई इंडियन्सची  मालिका सुरुच राहिल्याचे पाहायला मिळाले. 

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माने क्रिस लीनच्या साथीने डावाला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 24 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 19 धावा करुन धावबाद झाला. क्रिस लीन याने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक 49 धावा केल्या. सुर्यकुमार यादव 31 धावा करुन माघारी फिरल्यानंतर ईशान किशन (28), हार्दिक पांड्या 13 धावा करुन परतल्यानंतर पोलार्ड (7) आणि क्रृणाल पांड्या (7) नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरले. परिणामी मुंबई इंडियन्सचा डाव 9 बाद 159 धावांत आटोपला. 

या धावांचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहलीने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने डावाला सुरुवात केली. ही जोडी मुंबईच्या सलामी जोडीपेक्षा सरस ठरली असली तरी 36 धावांवर बंगळुरुने आपली पहिली विकेट गमावली. रजत पाटीदारला संधीच सोन करता आलं नाही. तो 8 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मॅक्सवेल आणि विराटने 50 + धावांची भागीदारी करुन सामन्यावर मजबूत पकड मिळवली. बुमराहने विराट कोहलीची विकेट घेत बंगळुरुला अडचणीत आणले. मार्कोने मॅक्सवेलला बाद केल्यानंतर सामना पुन्हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकला. पण एबीने शेवटपर्यंत खिंड लढवली. अखेरच्या 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना दोन धाव घेण्याच्या नादात एबी बाद झाला. त्याने 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. बंगळुरुकडून सर्वाधिक 5 विकेट्स टिपणाऱ्या हर्षल पटेलने विजय धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT