Indian team practice for first match in Chennai ODI World Cup cricket Sakal
क्रीडा

चेन्नईत पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाचा सराव सुरू

समारंभ संपले; आता क्रिकेटवर लक्ष

सुनंदन लेले

चेन्नई : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ चेन्नईला येऊन धडकला तरी कप्तान रोहित शर्मा सोबत नव्हता. इतके दिवस रोहित फक्त खेळाडू म्हणून संघात होता. आता तो कप्तान असल्याने आयसीसीने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना हजर राहण्यावाचून पर्याय नसतो. दहा संघांचे कप्तान एकत्र येऊन फोटो सेशन झाले. मग सगळ्यांची सुटका झाली. जो तो कप्तान आपल्या संघाचा पहिला सामना असेल तिथे रवाना झाला आणि रोहित शर्मा चेन्नईला येऊन पोहोचला.

कर्णधार म्हणून काही अतिरिक्त कामे करावी लागतात. सर्व अधिकृत समारंभांना हजर रहावे लागते. बऱ्‍याच फोटो सेशन्समध्ये भाग घ्यावा लागतो. अर्थात हे सगळे करताना मजा येते. फक्त समारंभांना हजर राहण्यासाठी प्रवास जास्त करावा लागतो. आता सगळे झाले आहे आणि मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला तयार झालो आहे, रोहित शर्माने खास त्याच्या शैलीत चेपॉक मैदानावर क्षणभर भेटला असता मान हलवत म्हणाला.

दोनही सराव सामने पावसाने धुतले गेल्याने भारतीय संघाने सरावात चांगलेच मन रमवलेले दिसले. संघातील सर्व खेळाडू चेपॉक मैदानावर हजर झाले होते. चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख खेळाडू नात्याने स्थानिक खेळाडू बनलेला रवींद्र जडेजाने मुख्य खेळपट्टीजवळ जाऊन जणू काही मनातल्या मनात प्रार्थना केली.

जाळ्यातील सरावाअगोदर अत्यंत सविस्तर व्यायाम करून अंग गरम केले गेले. बरेच खेळाडू फुटबॉल हलकेच खेळून आनंद घेताना दिसले. ज्यात विराट कोहलीचा सहभाग जरा जास्त होता. किक करताना विराट सहजी फुटबॉल हाताळत होता. त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा सराव करून मग खेळाडू मुख्य मैदानामागच्या सराव सुविधेकडे रवाना झाले. खेळाच्या सरावासोबत चेन्नईच्या गरम हवामानाची सवय करून घेणे हा सुद्धा मुख्य उद्देश दिसला.

सतत पाणी पिण्याचा सल्ला

नेटमधील सराव करताना फलंदाज मान खाली घालून फटकेबाजी करत आहेत ना, याकडे प्रशिक्षक राहुल द्रविडचे बारीक लक्ष दिसले. बचाव असो वा आक्रमक फटका, खेळताना नजर चेंडूवर राहण्यासाठी मान खाली पाहिजे, हे मूलभूत तंत्र राहुल द्रविड तपासून घेत होता. वेगवान गोलंदाज ३-४ षटकांचा सलग मारा करून किती थकायला होते याचा अंदाज घेत होते. सर्व खेळाडूंवर सतत पाणी पिण्यासाठी सुचवत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे मिळालेल्या मदतीची रक्कम वजा करून मदत दिली जात - संजय पाटील घाटणेकर

SCROLL FOR NEXT