IND wins against WI.jpg
IND wins against WI.jpg 
क्रीडा

World Cup 2019 : World Cup 2019 : भारताचे सेमी फायनलचे तिकीट कन्फर्म; विंडीजवरही विजय

सुनंदन लेले

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय फलंदाजांनी कष्टाने 7 बाद 268 धावांचा फलक उभारला. विराट कोहलीने आणि धोनीच्या अर्धशतकी खेळ्यांमुळे धावसंख्येला थोडा आकार आला. फलंदाजांनी उभारलेल्या धावा किती भरपूर आहेत याचा प्रत्यय वेस्ट इंडीजची फलंदाजी चालू झाल्यावर प्रेक्षकांना आला. भारतीय गोलंदाजांनी मिळून 10 फलंदाजांची शिकार फक्त 143 धावात केली. गेल्या सामन्याचा मानकरी महंमद शमीने 4 महत्त्वाच्या विंडीज फलंदाजांना बाद करून भेदक गोलंदाजीची लय कायम ठेवली. भारताने सामना 125 धावांनी जिंकून एक पाऊल उपांत्य फेरीत ठेवले. कर्णधार विराट कोहलीला सामन्याचे मानकरी घोषित करण्यात आले. 

विजयाकरता 268 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजच्या डावाला शमीने हादरे दिले. महंमद शमीने पहिल्या स्पेलमधे ख्रिस गेल आणि शेय होप अशा दोन सर्वात चांगल्या फलंदाजांना बाद केले. त्यातील शेय होपला बाद करताना शमीने टाकलेला इनस्वींग चेंडू फलंदाजांसह बघणार्‍यांना चकीत करून गेला. अँम्ब्रीस आणि निकोलस पुरनने केलेला थोडा प्रतिकार मोडून काढल्यावर बाकीचे फलंदाज फक्त हजेरी लावून तंबूत परतले. 


हार्दिक पंड्याने अँम्ब्रीसला पायचित केल्यावर कुलदीप यादवने पुरनला मोठ्या फटक्याच्या मोहात पाडून बाद केले. कप्तान जेसन होल्डरला कोहलीने अगदी पद्धतशीरपणे जाळ्यात ओढले. जसप्रीत बुमराने पाठोपाठच्या चेंडूवर कार्लोस ब्राथवेट आणि अ‍ॅलनला बाद करून सामना भारताकडे खेचला. मग विजयाची औपचारिकता शमीने शेवटच्या फलंदाजाला बाद करून पूर्ण केली.

त्याअगोदर सकाळी नाणेफेकीचा कौल परत एकदा विराट कोहलीच्या बाजूने लागला. संघात एकही बदल न करता कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीज संघात दोन नवीन खेळाडूंना संधी दिली गेली. चांगली सुरुवात करणार्‍या रोहित शर्माला मैदानावरील पंचांनी नाबाद ठरवले असताना तिसर्‍या पंचांनी अत्यंत घाईने झेलबाद ठरवले तो निर्णय कोणालाच पटला नाही. चेंडूने बॅटची कड घेतली नव्हती हे टीव्ही रिप्ले मधे दिसत असून पंचांनी घेतलेल्या निर्णयाला क्रिकेटच्या भाषेत ‘पंचांनी राखी बांधली’ म्हणतात. 

लोकेश राहुलने आश्वासक फलंदाजी केली. विराट कोहलीबरोबर राहुलने 69 धावांची भागीदारी रचली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या राहुलने जम बसलेला असताना पाय न हलवता खेळायचा केलेला प्रयत्न वाईट ठरला. विराट कोहली झकास फलंदाजी करत असताना मधल्या फळीत भारतीय फलंदाजी गडबडताना परत एकदा दिसली. विजय शंकर आणि केदार जाधवला छाप पाडता आली नाही. 

कोहलीचे अर्धशतक पार पडले अताना अवघ्या 8 धावांवर महेंद्र सिंह धोनीला मोठे जीवदान लाभले. अ‍ॅलनच्या फिरकीला पुढे येऊन खेळताना धोनी साफ चकला असताना विकेट किपर शेय होपने यष्टिचीत करायची अत्यंत सोपी संधी गमावली. जेसन होल्डरच्या जास्त डंख नसलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर कोहलीने ब्राव्होकडे सोपा झेल दिला तो धक्का मोठा होता.

250च्या पुढे धावसंख्या नेण्याकरता धोनी - हार्दिक पंड्याला भागीदारी करणे गरजेचे होते. दोघांनी चांगल्या गोलंदाजीला मान देत कष्टाने धावफलकाला आकार दिला. पंड्या 46 धावा करून कॉटरेलला बाद झाला. त्याच षटकात कॉटरेलने शमीला शून्यावर तंबूत परत पाठवले. भारताला 260 धावांचा पल्ला गाठता आला कारण परिस्थितीचा अंदाज घेत धोनीने नाबाद 56 धावा केल्या. शेवटच्या षटकात धोनीने 2 षटकार आणि एक चौकार मारून संघाला 260 धावांच्या पुढे नेले होते.

दोन दिवसांच्या विश्रातीनंतर भारतीय संघाला तगड्या इंग्लंड संघाशी मुकाबला करायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT