Indian women's challenge are finish
Indian women's challenge are finish 
क्रीडा

भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात 

वृत्तसंस्था

बॅंकॉक - भारतीय महिला बॅडमिंटन संघाचे उबेर करंडक स्पर्धेतील आव्हान बुधवारी संपुष्टात आले. पाच वेळच्या विजेत्या जपानकडून भारताला 5-0 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. 

गेल्या स्पर्धेत भारताने दोन ब्रॉंझपदके मिळवली होती. पण या वेळी पी. व्ही. सिंधू आणि अश्‍विनी पोनप्पा यांच्या गौरहजेरीत खेळणाऱ्या भारतीय युवा खेळाडू अव्वल मानांकित जपानपुढे कमी पडले. 

संपूर्ण लढतीत वर्चस्व गाजवल्यानंतर आणि टाळत्या येणाऱ्या चुकांची मालिकाच राहिल्यामुळे साईनाला आकाने यामागुचीकडून संघर्षपूर्ण लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. चार मॅच पॉइंट गमावणाऱ्या साईनाने लढत 19-21, 21-9, 20-22 अशी गमावली. पहिल्या दुहेरीत प्राजक्ता सावंत आणि संयोगिता घोरपडे या देखील आयाका ताकाहाशी-मिसाकी मात्सुतोमो यांचा सामना करू शकल्या नाहीत. त्या 15-21, 6-21 अशा हरल्या. 

एकेरीच्या दुसऱ्या लढतीत जगज्जेत्या नोझोमी ओकुहारा हिने वैष्णवी रेड्डीची शिकवणी घेत 28 मिनिटांत 21-10, 21-13 असा विजय मिळविला. त्यानंतर वैष्णवी भाले-मेडना जक्काम्पुडी दुहेरीत आणि अरुणा प्रभुदेसाई एकेरीत प्रतिस्पर्ध्याला आव्हान देऊ शकल्या नाहीत. 

पहिल्या लढतीत भारतीय महिलांना जपानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा विजय मिळविला. मात्र, जपानविरुद्ध त्यांना आपला खेळ दाखवता आला नाही. सिंधू आणि पोनप्पा यांची उणीव निश्‍चितपणे जाणवली. 

साईनाला शिक्षा 

पहिल्या गेमपासून साईनाने लढतीवर चांगले नियंत्रण राखले होते. मात्र, त्याच त्या चुका परत परत केल्याची शिक्षा तिला मिळाली. आपल्या क्रॉस कोर्टच्या फटक्‍यांनी तिने पहिल्या गेममध्ये यामागुचीसमोर जरुर आव्हान उभे केले. त्यानंतरही यामागुचीने अधिक सरस खेळ करत पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेमच्या मध्याला साईनाने 11-6 अशी आघाडी मिळवून आपले वर्चस्व राखले. रॅलिजमध्ये दाखवलेला संयम आणि कोर्टचा सुरेख वापर करून साईनाने दुसरी गेम जिंकत लढत निर्णायक गेममध्ये नेली. या गेमला आघाडीसाठी रस्सीखेच झाली. कधी साईना, तर कधी यामागुची अशी आघाडी हलती होती. यामागुचीच्या ताकदवान फटक्‍यांचा सुरेख बचाव करत साईनाने 15-11 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर यामागुचीने आघाडी परत मिळवित साईनाला आव्हान दिले. त्या वेळी साईनाने जोरदार प्रतिकार करत चार मॅच पॉइंट मिळविले. पण, ते तिला विजयात रुपांतरीत करता आले नाहीत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT