Arjun Tendulkar News Sakal
क्रीडा

Arjun Tendulkar Debut: अर्जुन तेंडुलकर IPLमध्ये करणार पदार्पण? कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा करणार पदार्पण

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 Arjun Tendulkar Debut : इंडियन प्रीमियर लीग 2023च्या आधी मुंबई इंडियन्स कॅम्पमधून मोठी माहिती समोर आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लीगमध्ये पदार्पण करू शकतो.

हंगाम सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मार्क बाऊचर यांनी डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूबाबत मोठे वक्तव्य केले. त्याने म्हटले आहे की व्यवस्थापनाच्या नजर अर्जुनवर आहेत आणि त्याला यावर्षी प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

अर्जुन गेल्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे, परंतु दोन्ही हंगामात तो बेंचवर बसला होता. गेल्या रणजी मोसमात त्याने गोव्यासाठी पदार्पणातच शतक झळकावले. याशिवाय गोलंदाजीतही तो खूप प्रभावित झाला होता. तो सध्या गोलंदाजी करत नसल्याचेही पत्रकार परिषदेदरम्यान उघड झाले. तो दुखापतग्रस्त असून बुधवारपासून गोलंदाजी सुरू करणार आहे.

पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, अर्जुन तेंडुलकरने अलीकडच्या काळात चांगले क्रिकेट खेळले आहे. त्याला दुखापत झाली होती, मात्र आज तो गोलंदाजीला सुरुवात करणार आहे.

तर मार्क बाउचर म्हणाला, अर्जुन गेल्या काही काळापासून चांगले क्रिकेट खेळत आहे. तो चांगली गोलंदाजी करत आहे. आम्हाला वाटते की तो या वर्षी प्लेइंग 11 मध्ये असेल.

अर्जुन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत केवळ 7 प्रथम श्रेणी, 7 लिस्ट ए आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 32 विकेट घेतल्या असून एकूण 268 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या संघासाठी मागील हंगाम चांगला गेला नाही. संघ शेवटच्या स्थानावर राहिला. मुंबई इंडियन्स 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध IPL 2023 मध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT