Akash Madhwal GT vs MI esakal
IPL

Akash Madhwal GT vs MI : MI स्टार आकाश माधवालवर स्थानिक स्पर्धांमध्ये घातली होती बंदी; भाऊ आशिष म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Akash Madhwal GT vs MI : मुंबईने आयपीएलच्या 16 व्या हंगामात एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. मुंबईचा युवा वेगवान गोलंदाज आकाश माधवालने तर कमाल केली. त्याने 3.3 षटकात 5 धावात 5 बळी टिपले. आयपीएलमधील हा सर्वात किफायशीर स्पेल ठरला. मुंबई इंडियन्ससाठी महत्वाच्या टप्प्यावर आकाश माधवालने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रीडा जगतात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

दरम्यान, उत्तराखंडच्या रूरकी शहरातून येणाऱ्या आकाश माधवालची क्रिकेट ते इंजिनियर आणि पुन्हा क्रिकेट हा प्रवास खूप रंजक आहे. त्याचा भाऊ आशिष माधवालने आकाशसोबत घडलेला एक किस्सा सांगितला.

आशिषने इंडिया टूडेशी बोलताना सांगितले की, 'रोहित भाई खेळाडूंना चांगली संधी देतो. तो खेळाडूंवर विश्वास ठेवतो, त्यांना पाठिंबा देतो. नवीन खेळाडू हा कायम घाबरलेला असतो त्याला संघातील स्थान जाण्याची भिती असते. रोहित ही भितीच दूर करून टाकते. आकाश आता चांगली कामगिरी करत आहे.'

आकाशचा भाऊ आशिष पुढे म्हणाला की, 'इंजिनियरिंग झाल्यानंतर आकाश काम करत होता. मात्र लोकं त्याच्याकडे प्रत्येक दिवशी यायची आणि त्याला आज काम करू नकोस आमच्याकडून खेळ आम्ही तुला पैसे देते असे सांगायचे. त्यानंतर आकाशमध्ये बदल झाला. तो उत्तराखंडच्या संघात निवडल्यानंतर तो एक घातक गोलंदाज झाला.'

आकाश हा आधी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. मात्र त्याला स्थानिक स्पर्धांमध्ये बंदीचा सामना करावा लागला होता. आशिष ने सांगितले की, 'कोणीही त्याला इथे खेळू देत नव्हते. त्याच्या गोलंदाजीला सर्वजण घाबरत होते. त्यामुळे त्याच्यावर स्थानिक स्पर्धांमध्ये बंदी घातली होती. सगळीकडे भितीचे वातावर होते. आकाश रूरकीच्या बाहेर जाऊनच खेळत होता.

आशिष म्हणाला की, 'हो आता त्याचे टेनिस बॉलचे दिवस गेले. आता तो खूप खूष आहे. रोहित शर्माने त्याचे 50 टक्के टेन्शन दूर केले आहे. पाहा त्यांचे बाँडिंग कसे आहेत.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

Bullock Cart Racing : 'किंग' ठरला सांगलीचा खिलार! बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठताच खोंडांची तुफान क्रेझ; लाख-दीड लाखाचा खोंड विकला जातोय 8 लाखांत

विशेष : इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कसा भरावा?

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT