Rohit Sharma Virat Kohli T20 : विराट - रोहित अँकर रोलवरून भिडले; आता हार्दिक पांड्या काय करणार?

Rohit Sharma Virat Kohli T20 Anchor Role
Rohit Sharma Virat Kohli T20 Anchor Roleesakal
Updated on

Rohit Sharma Virat Kohli T20 Anchor Role : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. आता रोहितचा संघ आज (दि.26) हार्दिकच्या गुजरातशी भिडणार आहे.

दरम्यान, एलिमिनेटर सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमध्ये अँकर बॅट्समनच्या भुमिकेविषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी रोहित शर्माने विराट कोहलीपेक्षा खूप वेगळे मत व्यक्त केले. आता कोणाची भुमिका योग्य आणि कोणाची अयोग्य हे येणारा काळच ठरवणार आहे.

Rohit Sharma Virat Kohli T20 Anchor Role
IPL 2023 : फायनलच्या तिकिटांसाठी क्रिकेटप्रेमीमध्ये हाणामारी! चेंगराचेंगरीचा Video पाहून उडेल थरकाप

रोहित शर्मा म्हणाला की, 'ज्या प्रकारे सध्या टी 20 क्रिकेट खेळले जात आहे ते पाहता माझ्या मतानुसार आता अँकर इनिंग खेळण्याऱ्या फलंदाजीची कोणती भुमिका उरलेली नाही. तुमची अवस्था 3 किंवा 4 बाद 20 धावा अशी असते. मात्र असं प्रत्येक दिवशी होणार नाहीये. थोड्या वेळाने तुम्ही डाव सावराल त्यावेळी कोणालातरी डाव पुढे नेत मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. आता अँकरची काही भुमिका राहिलेली नाही. खेळाडू आता वेगळ्या प्रकारे खेळत आहेत. जर तुम्ही तुमची मानसिकता बदलली नाही तर तुमचा वाईट पद्धतीने पराभव होऊ शकतो. लोकं दुसऱ्या प्रकारे खेळाबाबत विचार करत आहेत.'

रोहित पुढे म्हणाला की, 'सातही फलंदाजांना आपली आपली भुमिका बजावायची आहे. मला वाटते की तुम्ही चांगल्या धावा करत असाल तर ती चांगली गोष्ट आहे. मात्र जर प्रत्येक फलंदाज 10-15 ते 20 चेंडूत 30 ते 40 धावा करत असेल तर तो देखील आपल्या टीमसाठी काम करत आहे क्रिकेट बदललं आहे.'

Rohit Sharma Virat Kohli T20 Anchor Role
WTC Final Prize Money: भारत चॅम्पियनशिप जिंकल्यास मिळणार 13 कोटी रुपये, पाकिस्तानच्या पदरात किती?

अँकर रोलबद्दल विराट कोहली म्हणाला की, 'हो नक्कीच ही महत्वाची भुमिका आहे. मी याबाबत पूर्ण सहमत आहे. अनेक लोकं त्या परिस्थिती नसल्याने खेळाला वेगळ्या दृष्टीकोणातून पाहत आहेत. अचानक पॉवर प्ले झाल्यावर ते म्हणायला लागतील की त्याने स्ट्राईक रोटेट करण्यास सुरूवात केली आहे. पॉवर प्लेमध्ये एकही विकेट जात नाही तेव्हा सहसा विरोधी संघातील सर्वात चांगला गोलंदाज गोलंदाजी करतो. तुम्ही त्याची पहिली दोन षटके तो काय करतोय हे शोधण्याचा प्रयत्न करता कारण तुम्ही शेवटच्या दोन षटकात त्याच्याविरूद्ध काहीतरी मोठं करू शकाल. त्यामुळे त्या खेळाडूसाठी आणि उर्वरित डावही सोपा होऊन जातो.'

विराट कोहलीने भारताकडून 115 टी 20 सामन्यात 52.74 च्या सरासरीने 137.93 च्या स्ट्राईक रेटने 4008 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने 148 टी 20 सामन्यात 30.82 च्या सरासरूने 139.25 च्या स्ट्राईक रेटने 3853 धावा केल्या आहेत. विराटची सरासरी रोहितपेक्षा चांगली आहे तर स्ट्राईक रेटमध्ये रोहित विराटवर किंचीत भारी पडतोय. आता भारतीय टी 20 संघात अँकर इनिंग खेळणारा फलंदाज हवा की नको याचा निर्णय नवा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्यालाच घायचा आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com