Ambati Rayudu fresh attack on RCB 
IPL

रायडूच्या आणखी एका ट्विटने उडवून दिली खळबळ, पुन्हा विराटवर साधला निशाणा?

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायडू याने सलग दुसऱ्या दिवशी विराट कोहलीचे नाव न घेता त्याच्यावर तिखट शब्दांत प्रहार केला आहे.

Kiran Mahanavar

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायडू याने सलग दुसऱ्या दिवशी विराट कोहलीचे नाव न घेता त्याच्यावर तिखट शब्दांत प्रहार केला आहे. काही खेळाडू संघापेक्षा स्वतःच्या विक्रमाला प्राधान्य देतात, असे त्याने म्हटले आहे.

यंदाच्या स्पर्धेत आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात बंगळूरने चेन्नईचा पराभव करून प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आणि गतविजेत्या चेन्नईचे आव्हान संपले. मात्र सामन्यानंतर प्रामुख्याने विराट कोहलीने केलेला जल्लोष चेन्नईच्या पाठीराख्यांना खिजवणारा होता. रायडूलाही तो पटला नाही. त्यामुळे कालच त्याने विराटवर टीका करणारे भाष्य केले होते.

आजही त्याने आपल्या तिखट भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा सहारा घेतला. त्यात एक भलीमोठी पोस्ट लिहून विराटला टार्गेट केले आहे.

अनेक वर्षांपासून आपल्या संघाला मनापासून पाठिंबा देत असलेल्या बंगळूरच्या पाठीराख्यांचे मला वाईट वाटत आहे. संघ व्यवस्थापन आणि संघातील काही लिडर्स यांनी वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघ हिताला प्राधान्य दिले असते तर बंगळूर संघाने आतापर्यंत अनेक विजेतेपदे मिळवली असती. जरा विचार करा, या दरम्यान तुम्ही किती चांगल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. संघ हिताला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य द्या. पुढच्या वर्षी मेगा लिलाव होणार आहे. तेव्हापासून नवा अध्याय सुरू करा... असे रायडूने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रायडूचा हा राग केवळ विराट कोहलीवर असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या स्पर्धेत विराटने सर्वाधिक धावा केलेल्या आहेत, तरीही त्याचा संघ प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यातच बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT