Mitchell Marsh sakal
IPL

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाला धोका पत्करायचा नसल्याने कर्णधाराने IPL मधून घेतली माघार?

अगोदरच तळ्यात-मळ्यात अशी कामगिरी होत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Kiran Mahanavar

अगोदरच तळ्यात-मळ्यात अशी कामगिरी होत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हुकमी अष्टपैलू ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्शचा मांडीचा स्नायू दुखावला आहे. त्यावरील उपचारासाठी तो मायदेशी परतणार आहे.

आयपीएल संपल्यानंतर काही दिवसांत सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मार्शची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया धोका पत्करणार नाही. मार्श आयपीएलमधील उर्वरित सामन्यात खेळणार की नाही याबाबत अजून ठामपणे सांगण्यात आलेले नसले तरी तो स्पर्धेतून बाहेर गेल्यातच जमा आहे.

मार्श यंदाच्या आयपीएलमधील त्याचा अखेरचा सामना ३ एप्रिल रोजी कोलकाताविरुद्ध खेळला आहे. त्यानंतरच्या मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायटंस यांच्याविरुद्धच्या सामन्यातून त्याने माघार घेतली होती.

मार्शला यंदा ठोस अशी कामगिरी करता आलेली नाही. राजस्थानविरुद्धच्या लढतीत केलेल्या २३ धावा हीच त्याची सर्वाधिक खेळी होती. कोलकाताविरुद्ध तर त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. मार्शसह ऑस्ट्रेलियाचा आणखी एक हुकमी खेळाडू डेव्हिड वॉर्नर दिल्ली संघाच्या बुधवारी होणाऱ्या सामन्याबाबतही साशंक असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात झेल पकडताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT