BCCI SGM Meeting World Cup 2023 Jay Shah
BCCI SGM Meeting World Cup 2023 Jay Shah esakal
IPL

BCCI World Cup 2023 : अहमदाबादमध्ये बैठक; आयपीएल फायनलपूर्वीच वर्ल्डकप सामन्यांची ठिकाणे होणार फायनल

अनिरुद्ध संकपाळ

BCCI SGM Meeting World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 ला आता काही महिनेच शिल्लक आहेत. त्यामुळे बीसीसीआयने कंबर कसली असून आयपीएलच्या फायनलपूर्वीच बीसीसीआयची सर्वसाधारण बैठक आयोजित केली आहे. आयपीएलची फायनल ही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी 27 मे रोजी अहमदाबादमध्येच बीसीसीआयची सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत वनडे वर्ल्डकपचे सामने खेळवण्यासाठी 12 ठिकाणे फायनल केली जाणार आहेत. याचबरोबर लौंगिक अत्याचार विरोधी धोरणातील त्रुटी दूर करण्यासाठी देखील याच बैठकीत चर्चा केली जाईल. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला एनएचआरसीकडून पत्र आले आहे.

स्पोट्स स्टारने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआने अहमदाबादमध्ये विशेष सर्वसाधारण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा देखील उपस्थित राहणार आहेत. हे सर्वजण आयपीएलचा फायनल सामना पाहण्यासाठी देखील उपस्थित असतील. या बौठकीत पाच मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

बीसीसीआयच्या बैठकीतील पाच मुद्दे

पायाभूत विकास आणि अनुदान समितीची स्थापना करणे

राज्य संघात सायको थेरपिस्ट आणि ट्रेनर नियुक्त करण्याची नियमावली तयार करणे.

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 साठी वर्किंग ग्रुपची स्थापना करणे.

महिला प्रीमियर लीगसाठी समिती स्थानप करणे.

लैंगिक अत्याचार विरोधी धोरणातील त्रुटी दूर करणे.

आयसीसी वनडे वर्ल्डकप हा फक्त 4 महिने दूर आहे. आयसीसीने याबाबतचे वेळापत्रक अजून जाहीर केलेले नाही. 10 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी 12 ठिकाणे नक्की करायची आहेत. बीसीसीआय सर्वसाधारण बैठकीत वर्किंग ग्रुप फायनल करेल. याचबरोबर महिला प्रीमियर लीगचे काम देखील सुरू करण्यात येईल. बीसीसीआय महिला प्रीमियर लीग दिवळीत घेण्यासाठी उत्सुक आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Kiran Mane: "सुषमा अंधारेताईंनी हा पर्दाफाश केला तेव्हा...", राज ठाकरेंच्या व्हायरल पत्राबाबत किरण मानेंची पोस्ट; नेत्यांना म्हणाले...

Weather Update: पुणे, मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पाऊस लावणार हजेरी; तर उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Marathi News Live Update: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

लहान मुलांना सारख्या उचक्या का येतात? जाणून घ्या कारण आणि उपाय

SCROLL FOR NEXT