Common Factor Of 2016 Virat Kohli and 2022 Jos Buttler in IPL
Common Factor Of 2016 Virat Kohli and 2022 Jos Buttler in IPL esakal
IPL

IPL : '2016 चा कोहली अन् 2022 चा बटलर यांच्यात अनेक कॉमन फॅक्टर'

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : जॉस बटलरने (Jos Buttler) यंदाच्या आयपीएल हंगामात धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने चार शतके ठोकत हंगामातील 17 सामन्यात 863 धावा केल्या. त्याच्या या तुफानी बॅटिंगमुळे तो आता विराट कोहलीचा (Virat Kohli) 2016 चा 973 धावांचा विक्रम मोडतो की काय असे वाटू लागले होते. त्याने हंगामात सर्वाधिक शतकांचा विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली. मात्र विराटचा धावांचा विक्रम मात्र कायम राहिला. दरम्यान, विराट कोहलीच्या 2016 च्या ड्रीम आयपीएल हंगामात आणि जॉस बटलरच्या 2022 च्या हंगामात काही कॉमन फॅक्टर (Common Factor) आहेत.

आयपीएलच्या 2016 च्या हंगामात रन मशीन विराट कोहलीने इतिहास रचला होता. त्याने रॉयल चॅलेंजर बेंगलोरसाठी 973 धावा ठोकल्या. त्याने एकट्याच्या जीवावर आरसीबीला फायनलमध्ये पोहचवले होते. 2022 मध्ये देखील जॉस बटलरने एकट्या जीवावर राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. विराट कोहलीने 2016 च्या हंगामात चार शतके ठोकली. जॉस बटलरने 2022 च्या हंगामात त्याची बरोबरी केली.

2016 च्या हंगामात विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी होता. मात्र त्याला सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. 6 वर्षानंतर 2022 मध्ये हाच कित्ता गिरवला गेला. बटलरने संघाला फायनलपर्यंत पोहचवले. मात्र शेवटचा सामना जिंकता आला नाही. जॉस बटलरला ऑरेंज कॅप जिंकून देखील कप जिंकता आला नाही.

विराट आणि बटलर यांच्यातील कॉमन फॅक्टर इथंच संपत नाहीत. 2016 ला आरसीबी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होती. तर 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स देखील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होती. दोन्ही हंगामात गुजरातच्या संघांनी गुणतालिकेत टॉप केले होते. याचबरोबर 2016 आणि 2022 या हंगामाची फायनल 29 मे ला खेळली गेली. यात कोहलीची रॉयल आणि बटलरची रॉयल्स उपविजेती ठरली. सध्या हे 2016 च्या विराट कोहली आणि 2022 च्या जॉस बटलर यांच्यातील कॉमन फॅक्टर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT