MI vs RCB
MI vs RCB 
IPL

IPL 2021 : यंदा मुंबईचं काही खरं नाही; बंगळुरुसमोर पुन्हा टेकले गुडघे

सुशांत जाधव

IPL 2021 RCB vs MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा दणका दिलाय. यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत बंगळुरुने स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या टप्प्यात दुबईच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 54 धावांनी विजय नोंदवत गुणतालिकेतील आपले स्थान भक्कम केले. अखेरच्या षटकात हर्षल पटेलनं हॅटट्रिक पूर्ण केली. एवढेच नाही तर शेवटची विकेही त्यानेच घेतली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 111 धावात गारद झाला. रोहित शर्मा 43 (28) आणि क्विंटन डिकॉक 24 (23) या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

कर्णधार विराट कोहली 51 (42) आणि ग्लेन मॅक्सवेल 56 (37) यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर बंगळुरुच्या संघाने मुंबई इंडियन्ससमोर 166 धावांचे आव्हान ठेवले होते. बंगळुरुकडून एस भरतने 32 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, मिल्ने आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत संघर्ष करत असलेल्या रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात महत्त्वपूर्ण सामना होत आहे. रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात स्थान दिले आहे.

111-10 : एडम मिल्नेची विकेट घेत हर्षल पटेलचा चौकार, मुंबईचा डाव 11 धावात खल्लास!

111-9 : चहलच्या खात्यात आणखी एक विकेट, बुमराह 5 धावांवर बाद

106-8 : राहुल चाहरला पायचित करत हर्षल पटेलनं पूर्ण केली हॅटट्रिक!

106-7 : हर्षल पटेलची दुसरी विकेट, पोलार्डला 7 धावांवर केलं बोल्ड

106-6 : हार्दिक पांड्या 3 धावा करुन माघारी, हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला झेल

97-5 : मुंबईचा अर्धा संघ तंबूत; मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून सूर्यकुमारनं फकली विकेट

93-4 : कृणाल पांड्या मॅक्सवेलच्या जाळ्यात अडकला, 5 11 चेंडूत पाच धावा करुन माघारी

81-3 : चहलच्या खात्यात आणखी एक विकेट, 9 धाव करुन तंबूत

79-2 : मोठा मासा लागला मॅक्सवेलच्या गळाला, रोहित शर्मा 28 चेंडूत 43 धावा करुन तंबूत

57-1 : क्विंटन डिकॉकच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, चहलने 24 धावांवर केलं चालते.

मुंबई इंडियन्ससमोर 166 धावांचे आव्हान

162-6 : बोल्टनं शहाबाज अहमदच्या रुपात मिळाले यश

161-5 : सलग दुसऱ्या चेंडूवर बुमराहला दुसरी मोठी विकेट, एबी डिव्हिलियर्स 11 धावांवर माघारी

161-4 : बुमराहने घेतली मॅक्सवेलची विकेट, मॅक्सवेलने 37 चेंडूत 56 धावा ठोकल्या

किंग कोहलीने 42 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 51 धावांची खेळी केली

126-3 : अर्धशतकानंतर विराट कोहली माघारी, मिल्नेला मिळालं यश

75-2 : एस भरत 32 धावांची खेळी करुन माघारी, राहुल चाहरनं घेतली विकेट

कोहलीनं एस भरतच्या साथीनं 50 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला

7-1 : पडिक्कलच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का, बुमराहने त्याला खातेही उघडू दिले नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT