RCB vs MI : पर्पल कॅपचा हिरो हर्षल पटेलची हॅटट्रिक!

बंगळुरुकडून हॅटट्रिकचा पराक्रम करणारा पटेल तिसरा गोलंदाज
Harshal Patel
Harshal Patel

IPL 2021 RCB vs MI Harshal Patel Hat Trick : मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलनं कमालीची कामगिरी नोंदवली. यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बंगळुरुच्या जलदगती गोलंदाजाने मुंबई विरुद्ध हॅटट्रिकची नोंद केली. यंदाच्या हंगामातील ही पहिली हॅटट्रिक असून आयपीएलच्या इतिहासात 20 व्या हॅटट्रिकची नोंद झाली आहे.

आरसीबीकडून हॅटट्रिकचा पराक्रम करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. 2010 मध्ये पहिल्यांदा प्रविण कुमारने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात बंगळुरुच्या मैदानात हॅटट्रिक नोंदवली होती. सॅम्यूअल बद्रीनं 2017 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच हॅटट्रिकचा पराक्रम केला होता. त्यानंतर आता हर्षल पटेलने दुबईच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग तीन विकेट घेतल्या. हर्षल पटेलनं या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

Harshal Patel
IPL Record : विकेटमागे धोनीला तोड नाही!

मुंबईच्या डावातील 17 व्या षटकात हर्षल पटेल वैयक्तिक तिसरे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील पहिला चेंडू त्याने व्हाइड टाकला. हार्दिक पांड्या मोठा फटका खेळण्याच्या नादात कोहलीच्या हाती झेल देऊन परतला. नॉन स्ट्राईकवर असलेला आणि मुंबई इंडियन्सच्या विजयाची आस बनलेल्या केरॉन पोलार्ड हर्षल पटेलने बोल्ड केल. पोलार्डची जागा घेण्यासाठी आलेल्या राहुल चाहरला त्याने खातेही उघडू दिले नाही. त्याला पायचित करत हर्षल पटेलनं मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक पूर्ण केली.

Harshal Patel
IPL 2021 : यंदा मुंबईचं काही खरं नाही; बंगळुरुसमोर पुन्हा टेकले गुडघे

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 165 धावा केल्या होत्या. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीसह मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरुने मुंबईसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबईची अवस्था बिकट झाली. हर्षल पटेलनं बंगळुरुकडून सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. 3.1 षटकात त्याने 17 धावा खर्च करुन दमदार कामगिरीची नोंद केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com