MI vs RCB
MI vs RCB 
IPL

VIDEO : ...अन् चहलनं युवा ईशान किशनवर काढला राग!

सुशांत जाधव

IPL 2021 RCB vs MI : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात रंगलेल्या बंगळुरु आणि मुंबई यांच्यातील सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावात राहुल चाहरने केएस भरतची विकेट घेतल्यावर त्याला खुन्नस दिली. त्यानंतर मुंबईच्या फिरकीपटूनं केलेल्या कृत्याची परतफेड करण्यासाठी युजवेंद्र चहलने पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई इंडियन्सच्या डावातील 11 व्या षटकात चहलने ईशान किशनची विकेट घेतली. टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेल्या या युवा फलंदाजाची विकेटचा आनंद साजरा करताना चहल काहीतरी पुटपूटताना दिसले. त्याला कोणतीही प्रतिक्रिया न देता ईशान किशन तंबूत परतला.

ईशान किशन आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्या नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. चहलच्या गोलंदाजीवर तो चांगलाच गोंधळला. चहलला त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटची कड घेऊन हर्षल पटेलच्या हातात विसावला. रोहित आणि क्विंटन डिकॉक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या दोघांवर मुंबई इंडियन्सचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. पण ही दोघही अपयशी ठरली. त्याच्यापाठोपाठ इतर फलंदाजही स्वस्तात आटोपले.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या ईशान किशनची आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील कामगिरी खराब आहे. त्याने 8 डावात त्याने जवळपास 100 धावा केल्या आहेत. दुसरीकडे चहलला भारतीय टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. त्याचाच राग जणून तो विकेट घेतल्यानंतर ईशान किशनवर काढताना दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT