IPL 2022, CSK vs KKR
IPL 2022, CSK vs KKR  Sakal
IPL

CSK vs KKR : अजिंक्य खेळीसमोर धोनीची फिफ्टी फिकी

सुशांत जाधव

IPL 2022, CSK vs KKR : मुंबईतील वानखेडेच्या मैदानातील (Wankhede Stadium, Mumbai) सलामीच्या लढतीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) पहिल्यांदा बॅटिंग करताना धोनीच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 131 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा (Kolkata Knight Riders) सलामीवीर अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसमोर धोनींच अर्धशतक फिकं पडलं. कोलकाता संघाने 6 विकेट्स आणि 9 चेंडू राखून सामना खिशात घातला.

चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 132 धावांचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर जोडीनं कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी चेन्नईला बॅकफूटवर टाकणारी अशीच होती. व्यंकटेश अय्यर 16, नितिश राणा 21, सॅम बिलिंग्स 25 धावा करून माघारी फिरल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 20 आणि शेल्डन जॅक्सनने 3 धावा करत संघाला पहिला विजय मिळवून दिला.

सलामीच्या लढतीत श्रेयस अय्यरने नाणेफे जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. उमेश यादवनं आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्जला धक्का दिला. त्याने ऋतूराज गायकवाडला खातेही उघडू दिले नाही. न्यूझीलंडचा कॉन्वे अवघ्या 3 धावा करुन तेंबूत परतला. त्याची विकेटही उमेश यादवलाच मिळाली. रॉबिन उथप्पा आणि रायडू यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारीही केली. पण मिस्ट्री फिरकीपटू चक्रवर्तीनं ही जोडी फोडत चेन्नईला पुन्हा अडचणीत आणले. त्याने उथप्पाला 28 धावांवर चालते केले.

अंबाती रायडू मोक्याच्या क्षणी धावबाद झाला. त्याने संघाच्या धावसंख्येत 15 धावांची भर घातली. शिवम दुबे अवघ्या तीन धावा करुन परतला त्यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या धावफलकावर 5 बाद 61 धावा होत्या. इथून धोनी आणि जडेजाने डावाला आकार दिला. एमएस धोनीने 38 चेंडूत केलेल्या नाबाद 50 धावा आणि रविंद्र जडेजाने 28 चेंडूत केलेल्या 26 धावांच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 5 बाद 131 धावांपर्यंत मजल मारली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT