VIDEO : न्यू सेशन न्यू सेलिब्रेशन; डिजे ब्रावोचा नवा अंदाज |DJ Bravo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK VS KKR  DJ Bravo

VIDEO : न्यू सेशन न्यू सेलिब्रेशन; डिजे ब्रावोचा नवा अंदाज

आयपीएलच्या सलामीच्या लढतीत धोनीच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्स समोर 132 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं कोलकाताच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी कडक रिप्लाय देत धावा सहज करण्याचे संकेत दिले. पण चेन्नईचा नवा कॅप्टन रविंद्र जडेजाने चेंडू ब्रावोच्या हाती सोपवला आणि चेन्नईला पहिलं यश मिळाले.

ब्रावोनं व्यंकटेश अय्यराला 16 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. एवढ्यावर तो थांबला नाही तर नितीश राणालाही त्याने बाद केले. या दोन्ही विकेट्स घेतल्यानंतर ब्रावोने नव्या अंदाजात आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या अधिकृत अकाउंटवरुन ब्रावोच्या नव्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. न्यू सेशन न्यू सेलिब्रेशन या कॅप्शनसह शेअर केलेला व्हिडिओला अल्पावधीत चांगली पसंती मिळताना दिसते.

Web Title: Ipl 2022 Csk Vs Kkr Dj Bravo New Season New Celebrations Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top