IPL 2022 Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore
IPL 2022 Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore esakal
IPL

VIDEO | RCB vs KKR : नवाबांवर रॉयल्स पडले भारी; पाहा Highlights

सकाळ डिजिटल टीम

स्टॉयनिस - होल्डरची धडपड अखेर संपली. आरसीबीने सामना 18 धावांनी जिंकला. पाहा Highlights

135-6 : हेजलवूडचा तिसरा दणका

आरसीबीसाठी जॉस हेजलवूड हा ट्रम्प कार्ड ठरत आहे. त्याने लखनौचा तिसरा मोहरा टिपला. आयुष बदोनी 13 धावांची भर घालून माघारी परतला.

108-5 : क्रुणाल पांड्याची झुंजार खेळी मॅक्सवेलने संपवली

100-4 : सिराजने जोडी फोडली

कर्णधार केएल राहुल बाद झाल्यानंतर क्रुणाल पांड्या आणि दीपक हुड्डा ही अष्टपैलू जोडी भागीदारी करण्याच्या इराद्यात होती. मात्र मोहम्मद सिराजने हुड्डाला 13 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

64-3 : हर्षल पटेलने लखनौला दिला मोठा धक्का

हर्षल पटेलने लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलला 30 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.

33-2 : मनिष पांडेकडून पुन्हा निराशा

धावांच्या दुष्काळातून जात असलेल्या मनिष पांडेने आजच्या सामन्यात देखील निराशा केली. त्याला हेजलवूडने 6 धावांवर बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला.

17-1 : हेजलवूडचा लखनौला पहिला धक्का

आरसीबीचा अव्वल गोलंदाज जॉस हेजलवूडने सलामीवीर क्विंटन डिकॉकला 3 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

लखनौसमोर 182 धावांचे आव्हान

दिनेश कार्तिक पुन्हा एकदा नाबाद राहिला. त्याने 8 चेंडूत 13 धावा केल्या. तर आरसीबीकडून फाफा ड्युप्लेसिसने सर्वाधिक 96, शाहबाजने 26 ग्लेन मॅक्सवेलने 23 धावा केल्या.

181-6 : ड्युप्लेसिसचे शतक हुकले

आरसीबीचा डाव सावराणारा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसला आपले शतक पूर्ण करण्यात अपयश आले. तो 20 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर 96 धावांवर झेलबाद झाला.

132-5 : 70 धावांची भागीदारी संपुष्टात 

फाफ ड्युप्लेसिस आणि शाहबाज अहमदने पाचव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. मात्र शाहबाज 26 धावा करून धावबाद झाला आणि ही भागीदारी संपुष्टात आली.

कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने पडझडीनंतर डाव सावरला. 

फाफ ड्युप्लेसिसने विराट आणि मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव सावरत शाहबाज अहमदबरोबर भागीदारी रचली. त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

62-4 : सुयश प्रभुदेसाईकडून निराशा

गोव्याचा युवा खेळाडू सुयश प्रभुदेसाईला जेसन होल्डरने 10 धावांवर बाद केले.

44-3 : क्रुणाल पांड्याने मोठा मासा लावला गळाला

पहिल्याच षटकात दोन विकेट गेल्यानंतर आरसीबीचा कर्णधार ड्युप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डाव सावरण्याच प्रयत्न केला. मात्र क्रुणाल पांड्याने मॅक्सवेलला 23 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

7-2 : विराटला बाद करणारा चमीरा हॅट्ट्रिक चान्सवर 

अनुज रावतला बाद केल्यानंतर लगेचच चमीराने पुढच्याच चेंडूवर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला शुन्यावर पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला.

7-1 : पहिल्याच षटकात आरसीबीला धक्का

प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला चमीराने पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने अनुज रावतला 4 धावांवर बाद केले.

लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकली.

आयपीएलच्या 15 व्या हंगामात पडलेल्या प्रथेनुसार लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आरसीबीने सामना 18 धावांनी जिंकला

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने लखनौ सुपर जायंटचा 18 धावांनी पराभव केला. याचबरोबर आरसीबीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT