IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore esakal
IPL

VIDEO | MI vs RCB : मुंबई चेन्नईच्याच वळणावर; पाहा Highlights

सकाळ डिजिटल टीम

आरसीबीची विजयाची हॅट्ट्रिक; मुंबईचा सलग चौथा पराभव

130-2 : अर्जुन धावबाद, आरसीबीला दुसरा धक्का

अर्जुनने निशाणा साधला

अर्जुन रावतने दमदार फलंदाजी करत 38 चेंडूत 50 धावांची खेळी केली. त्याने विराट सोबत संघाला 14 व्या षटकात शंभरी पार करून दिली.

फाफ ड्युप्लेसिस बाद

आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने अर्जुन रावत सोबत 50 धावांची सलामी दिली. मात्र जयदेव उनाडकटने 16 धावांवर बाद केले.

सूर्यकुमारचा अखेरच्या चेंडूवर षटकार; मुंबईच्या 20 षटकात 6 बाद 151 धावा 

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

मुंबईचे सर्व शिलेदार पॅव्हेलियनमध्ये गेले असताना एकटा सूर्यकुमार यादव पुण्याच्या पिचवर लढला. त्याने 32 चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला 130 धावांच्या पार पोहचवले.

79-6 : हर्षल पटेलने दिला पुन्हा धक्का

भलत्याच फॉर्ममध्ये असलेल्या हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला अजून एक धक्का दिला. त्याने रमनदीप सिंगला 6 धावांवर बाद केले.

62-5 : हसरंगाच्या फिरकीत अडकला पोलार्ड

मुंबईची गळती सुरू झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कारॉन पोलार्ड डाव सावरतील असे वाटत होते. मात्र हसरंगाच्या एका जबरदस्त गुगलीने कायरॉन पोलार्डला शुन्यावर बाद केले.

62-4  : मुंबईची गळती सुरू; अवघ्या 12 धावात 4 विकेट

मुंबईचा कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या इतर फलंदाजांनी फक्त फज्जाला पाय लावून जाण्याचे कार्य केले. रोहितनंतर, डेवाल्ड ब्रेव्हिस (8), इशान किशन (26) आणि तिलक वर्मा (0) हे आल्या पावली परतले.

50-1 : मुंबईला पहिला धक्का; रोहित बाद 

मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करत अर्धशतकी मजल मारली. मात्र आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला ( 15 चेंडूत 26 धावा) हर्षल पटेलने बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला.

असे आहेत दोन्ही संघ

फाफ ठरला टॉस का बॉस

आरसीबीच्या फाफ ड्युप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईचा चौथा पराभव; आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक

पुणे : मुंबई इंडियन्सने आज चेन्नई सुपर किंग्जच्या हातावर हात मारला. मुंबईला यंदाच्या हंगामातील सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबईचे 152 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 व्या षटकात पार केले. आरसीबीकडून सलामीवीर अर्जुन रावतने दमदार फलंदाजी करत 47 चेंडूत 66 धावा केल्या. त्याला विराट कोहलीने 48 धावा करून चांगली साथ दिली. तत्पूर्वी मुंबईकडून सूर्यकुमार यादव एकटा भिडला. त्याने केलेल्या 68 धावांच्या जोरावर मुंबई 151 धावांपर्यंत मजल मारू शकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT