IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders ESAKAL
IPL

VIDEO | RCB vs KKR : केकेआरने आरसीबीला रडवले पाहा Highlights

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई: आयपाएल 2022 च्या 6 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने 3 विकेट्सनी कोलकाता नाईट राडर्सनेचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. केकेआरने ठेवलेल्या 129 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांना घाम फुटला. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलने केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीला विजय मिळवता आला.

आरसीबीला 129 धावा करतानाही घाम फुटला. केकेआरच्या गोलंदाजांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. पाहा या रोमहर्षक सामन्याचे हायलाईट्स

101-5 : केकेआरचे फाईट बॅक

डेव्हिड विली बाद झाल्यानंतर रदरफोर्ड आणि शाहबाजने आरसीबीचा डाव सावरत 39 धावांची भागीदारी रचली. मात्र वरूण चक्रवर्तीने 20 चेंडूत 27 धावा करणाऱ्या शाहबाज अहमदला बाद करत पाचवा धक्का दिला.

62-4 : डेव्हिड विलीची 28 चेंडूत 18 धावांची संथ खेळी नारायणने संपवली.

59-3 (10 Ov) : डेव्हिड विली - रूदरफोर्डने डाव सावरला

17-3 : उमेश यादवचा आरसीबीला मोठा धक्का

उमेश यादवने पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही नवीन चेंडूवर कर्णधाराला विकेट काढून दिल्या. त्याने आरसीबीची मोठी शिकार करत 7 चेंडूत 12 धावा करणाऱ्या विराट कोहलीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. उमेशच्या आधी टीम साऊदीने देखील फाफ ड्युप्लेसिसला बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला होता.

1-1 : पहिल्याच षटकात आरसीबीला उमेश यादवने दिला धक्का; अर्जुन रावत शुन्यावर बाद

128-10 : आरसीबीला शेवटची जोडी भिडली

आरसीबीच्या गोलंदाजांनी गेल्या सामन्यातील खराब कामगिरीत आजच्या सामन्यात कमालीची सुधारणा केली. त्यांनी केकेआरची अवस्था 9 बाद 101 धावा अशी केली होती. मात्र केकेआरची अखेरची जोडी उमेश यादव आणि वरूण चक्रवर्ती यांनी कडवा प्रतिकार करत केकेआरला 128 धावापर्यंत पोहचवले. अखेर आकाश दीपने उमेश यादवचा 18 धावांवर त्रिफळा उडवत ही झुंज संपवली.

99-8 : हर्षल पटेलने दिले केकेआरला दोन धक्के; शंभरी पार करणे देखील झाले मुश्किल

हर्षल पटेलने आधीच अडचणीत सापडलेल्या केकेआरचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलची 18 चेंडूत केलेली 25 धावांची खेळी संपवून त्यांना अजून एक मोठा धक्का दिला.

67-6 : वानंदूने एकाच षटकात केकेआरला दिले दोन धक्के

हसरंगाने प्रभावी फिरकी मारा करत केकेआरच्या सुनिल नारायण आणि शेल्डन जॅक्सन यांना 9 व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर पाठोपाठ बाद केले. यामुळे केकेआरची अवस्था 6 बाद 67 अशी झाली.

46-4 : वानंदू हसरंगाने केकेआरच्या कर्णधाराला फसवले फिरकीच्या जाळ्यात

केकेआरची टॉप आर्डर स्वस्तात माघारी गेल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरवर डाव सावरण्याचा मोठी जबाबदारी होती. मात्र वानंदू हसरंगाने त्याला 13 धावांवर बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला.

44-3 : नितिश राणाला आकाशदीपने केले बाद; केकेआरला तिसरा धक्का

32-2 : केकेआरचे दोन्ही सलामीवीर पोहचले पॅव्हेलियनमध्ये

व्यंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर मोहम्मद सिराजने पाचव्या षटकात केकेआरचा दुसरा सलामीवीर अजिंक्य रहाणेला 9 धावांवर बाद केले.

14-1 : व्यंकटेश अय्यर 10 धावा करून बाद

आकाशदीपने कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का दिला. त्याने आक्रमक फलंदाज व्यंकटेश अय्यरला 10 धावांवर बाद केले.

आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदजाचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Rankings: जो रुट पुन्हा 'अव्वल', संघसहकाऱ्यालाच टाकलं मागं; शुभमन गिल - रिषभ पंतचीही क्रमवारी घसरली

'मला दगडू सारखा 'अडल्ट जोक्स' करणारा मुलगा कधी व्हायचचं नव्हतं' प्रथमेश परब स्पष्टच बोलला

Aquarius Compatibility: कुंभ राशीसाठी 'मेड फॉर इच अदर' कोण? जाणून घ्या राशीनुसार नात्याचं भविष्य

Snake Video : सायलेन्सरमध्ये लपला होता खतरनाक साप, गाडी सुरू होताच पायाला...अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : भाजपची पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित

SCROLL FOR NEXT