
बाईकच्या सायलेन्सरमध्ये साप शिरल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून चिंता व्यक्त करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वाहन चालवण्यापूर्वी सायलेन्सर तपासणे ही आता काळाची गरज ठरली आहे.
Trending Video : सध्या सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाईकच्या सायलेन्सरमध्ये शिरणारा एक साप दिसून येतो, आणि तो पाहून कोणीही हादरून जाईल. बाईकप्रेमींसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. हा प्रकार पाहून सुरक्षितता ही संकल्पना केवळ रस्त्यापुरती मर्यादित नसून, आपल्या वाहनाच्या छोट्या भागातही धोका दडलेला असतो हे अधोरेखित होते.