IPL 2024 Final | KKR vs SRH | Travis Head Wicket Sakal
IPL

IPL Final, KKR vs SRH: स्टार्कचा स्विंग अन् अभिषेकचा झाला झुलता पूल... हैदराबादचं 'हेड'ही स्वस्तात पडलं; पाहा Video

IPL 2024 Final, KKR vs SRH: आयपीएल 2024 फायनलमध्ये केकेआरच्या वेगवान गोलंदाजांनी हैदराबादला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले.

Pranali Kodre

IPL 2024 Final, KKR vs SRH: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा (IPL 2024) अंतिम सामना रविवारी (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) हा सामना होत आहे.

या सामन्याच्या सुरुवातीलाच कोलकाता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली होती. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड सलामीला फलंदाजीला उतरले. परंतु कोलकाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात चेंडू स्विंग करत अभिषेकचा त्रिफळा उडवला. त्याच्या स्विंगसमोर अभिषेककडे कोणतेच उत्तर नव्हते. त्यामुळे अभिषेकला अवघ्या २ धावांवर माघारी परतावे लागले.

त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वैभव अरोराने टाकलेल्या चेंडूवर शॉट मारताना ट्रेविस हेड चुकला. चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करत मागे यष्टीरक्षण करत असलेल्या रेहमनतुल्लाह गुरबाजकडे गेला. गुरबाजने झेल घेतल्याने हेडला पहिलाच चेंडू खेळताना शुन्यावर माघारी परतावे लागले.

हेड आयपीएल प्लेऑफमध्ये कोलकाताविरुद्ध दुसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला. क्वालिफायर-1 सामन्यात त्याला मिचेल स्टार्कने शुन्यावर बाद केले होते.

त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि एडेन मार्करम यांनी हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्रिपाठी पाचव्या षटकात स्टार्कविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रमनदीप सिंगकडे झेल देत बाद झाला. त्याने 9 धावा केल्या.

दरम्यान, अंतिम सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोलकाताने बदल केलेला नाही, तर सनरायझर्स हैदराबादने शाहबाज अहमदला अब्दुल सामदच्या जागेवर संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

कोलकाता नाइट रायडर्स: रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर

सनरायझर्स हैदराबाद : ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेर्फेन रुदरफोर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT