Arjun Tendulkar sakal
IPL

IPL 2023 MI vs CSK: मुंबई दुखापतीच्या टेन्शनमध्ये अन् अर्जुन तेंडुलकरला करणार पदार्पण?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा करणार लीगमध्ये पदार्पण

Kiran Mahanavar

IPL 2023 MI vs CSK : इंडियन प्रीमियर लीगच 12 वा सामना हाय व्होल्टेज असणार आहे. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचे संघ आमनेसामने असतील. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांसमोरील प्रत्येक स्टार खेळाडूच्या खेळावर सस्पेन्स पाहायला मिळत आहे.

काही वेळापूर्वी बेन स्टोक्स टाचदुखीमुळे काही दिवस मैदानाबाहेर असल्याचे वृत्त समोर आले होते तर जोफ्रा आर्चरच्या खेळावरही सस्पेन्स दिसत आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आणि झ्या रिचर्डसन आधीच संघाबाहेर असताना मुंबई इंडियन्ससाठी ही समस्या वाढली आहे. अशा स्थितीत अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा फ्रँचायझीसोबतचा हा तिसरा हंगाम आहे. गेल्या दोन सीझनमध्ये बरीच अटकळ होती पण त्याला डेब्यू मिळाला नाही. गेल्या मोसमात मुंबईचा संघ दुखापती आणि खेळाडूंना वगळण्यात सतत झगडत होता. तरीही रोहित शर्माने ज्युनियर तेंडुलकरला संधी दिली नाही.

आता जोफ्रा आर्चरही बाहेर झाला तर अर्जुनला या सामन्यातून संधी मिळेल का? विशेष म्हणजे गेल्या देशांतर्गत हंगामात अर्जुनने चमकदार कामगिरी केली आहे. रणजीमध्ये पदार्पण करताना त्याने शतकही केले. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांना खेळायला देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अर्जुन शुक्रवारी सराव सत्रातही गोलंदाजी करताना दिसला.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीत सध्या आर्चर ही एकमेव ताकद आहे. बुमराह आणि रिचर्डसनच्या दुखापतीनंतर जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर आली आहे. मात्र शुक्रवारी सराव सत्रानंतर आलेली माहिती चिंताजनक होती. खरं तर, माजी भारतीय खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी यूट्यूबवर आपला व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये जोफ्रा आर्चरबद्दल अपडेट होते. त्याने सांगितले की, सराव सत्रात आर्चरच्या कोपराला चेंडू लागला, यानंतर त्याच्या खेळावर सस्पेन्स आहे. मात्र, एक दिवस आधी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड यांनी सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. आता बघू आर्चर खेळणार की नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT