Mumbai Indians IPL 2023  esakal
IPL

Mumbai Indians IPL 2023 : मुंबईचे नशीब पालटण्यासाठी संघात येणार ऑस्ट्रेलियन स्पीडगन!

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians IPL 2023 : मुंबई इंडियन्सने सालाबादप्रमाणे यंदाही आयपीएल हंगामाची पराभवाने सुरूवात केली. रॉयल चॅलेंजर बेंगलोरने त्यांचा तब्बल 8 गडी राखून पराभव केला. गेल्या हंगामात देखील मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब झाली होती. यंदाच्या हंगामाची सुरूवात देखील खराब झाली. यानंतर मुंबई यंदा तरी बाऊन्स बॅक करणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

यादरम्यानच मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात ऑस्ट्रेलियाची धडाडणारी तोफ रिले मेरेडिथचा समावेश केला आहे. मुंबईने दुखापतग्रस्त जेह रिचर्डसनच्या ऐवजी मेरेडिथला आपल्या संघात स्थान दिले.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर सोबत चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सुरूवातीला खराब फलंदाजी केली. मात्र तिलक वर्माने 46 चेंडूत 84 धावांची खेळी करत मुंबईला 171 या फायटिंग टोटलपर्यंत पोहचवले.

यानंतर मुंबई सामन्यात जोरदार पुनरागमन करेल असे वाटत होते. मात्र आरसीबीचा सलामी जोडी फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहलीने सुरूवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढण्यास सुरूवात केली. या दोघांनी 15 षटकात 148 धावा चोपल्या. अखेर आरसीबीने सामना 16.2 षटकात 172 धावा करत 8 गडी राखून जिंकला.

विराट कोहलीने नाबाद 82 तर फाफ ड्युप्लेसिसने 73 धावांची धडाकेबाज खेळी केली. मुंबईला आरसीबीचे फक्त दोन फलंदाज बाद करता आले. ड्युप्लेसिसला अर्शद खान आणि दिनेश कार्तिकला ग्रीनने बाद केले. त्यामुळे रिले मेरेडिथच्या संघात येण्याने बुमराहच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईची गोलंदाजी थोडी मजबूत होईल.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT