Shardul Thakur IPL 2023 : पेटलेल्या शार्दुल ठाकूरने केली जॉस बटलरची बरोबरी, केकेआरची वाचवली लाज

Shardul Thakur IPL 2023
Shardul Thakur IPL 2023ESAKAL
Updated on

Shardul Thakur IPL 2023 : घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक गमावल्यामुळे त्यांच्यावर प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली. मात्र केकेआरच्या डेव्हिड विली आणि कर्ण शर्मा यांनी त्यांची अवस्था 5 बाद 89 अशी केली होती. इथून केकेआर बाऊन्स बॅक करेल असे वाटत नव्हते. कारण आंद्रे रसेल देखील भोपळाही न फोडता माघारी गेला होता.

Shardul Thakur IPL 2023
KKR vs RCB IPL 2023 : रॉयल चॅलेंजरचा रॉयल पराभव; केकेआरने दिली 81 धावांनी मात

मात्र केकेआरकडे खडूस मुंबईकर शार्दुल ठाकूर होता. शार्दुल ठाकूरने अशा विपरित परिस्थितीत देखील आक्रमक पवित्रा कायम ठेवत आरसीबाच्या गोलंदाजांचा समाचार घेणे सुरू ठेवले. त्याने अवघ्या 20 षटकात अर्धशतकी मजल मारून संघाला देखील 150 च्या पार पोहचवले.

Shardul Thakur IPL 2023
Mumbai Indians IPL 2023 : मुंबईचे नशीब पालटण्यासाठी संघात येणार ऑस्ट्रेलियन स्पीडगन!

विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरचे हे हंगामातील आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. त्याने या बाबातीत राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरशी बरोबरी केली. त्याने देखील यंदाच्या हंगामात 20 चेंडूत अर्धशतकी मजल मारली होती.

शार्दुल ठाकूरने रिंकू सिंहं सोबत सहाव्या विकेटसाठी तब्बल 103 धावांची शतकी भागीदारी रचली. 19 व्या षटकात रिंकू 46 धावा करून बाद झाला. त्यानंतर शार्दुलने 29 चेंडूत 63 धावांची खेळी करत संघाला द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहचवले. अखेर उमेश यादवने चौकार मारत केकेआरला 20 षटकात 7 बाद 204 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com