KKR vs RCB IPL 2023 : रॉयल चॅलेंजरचा रॉयल पराभव; केकेआरने दिली 81 धावांनी मात

KKR vs RCB IPL 2023 : रॉयल चॅलेंजरचा रॉयल पराभव; केकेआरने दिली 81 धावांनी मात
Updated on

KKR vs RCB IPL 2023 : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने आपल्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्स राखून मोठा पराभव करत आयपीएलची दमदार सुरूवात केली. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्याच सामन्यात त्यांना जमिनीवर आणले.

केकेआरने शार्दुल ठाकूरच्या झंजावाती 63 धावांच्या जोरावर आरसीबीसमोर विजयासाठी 205 धावांचे मोठे लक्ष ठेवले. मात्र तगडी बॅटिंग लाईन असलेली आरसीबी चेस करताना 123 धावातच अडकली. केकेआरने आपल्या घरच्या मैदानावर आरसीबीचा 81 धावांनी मोठा पराभव केला.

इम्पॅक्ट प्लेअर सुयशचा धमाका 

केकेआरचा इम्पॅक्ट प्लेअर सुयश शऱ्माने दिनेश कार्तिकला 9 तर अनुज रावत आणि कर्ण शर्माला प्रत्येकी 1 धावेवर बाद करत आरसीबीची अवस्था 9 बाद 96 अशी केली.

83-6 : वरूण चक्रवर्तीने आरसीबीला आणली चक्कर

मुंबई इंडियन्सविरूद्ध 171 धावांचे आव्हान 16.2 षटकात पार करणाऱ्या आरसीबीची केकेआर विरूद्ध अवस्था 5 बाद 61 धावा अशी झाली. सलामीवीर विराट कोहली 21 कर्णधार फाफ ड्युप्लेसिस 23 धावा करून बाद झाले. त्यानंतर वरूण चक्रवर्तीच्या फिरकीपुढे आरसीबीच्या फलंदाजांना चक्कर यायला लागली.

चक्रवर्तीने ड्युप्लेसिस सह मॅक्सवेल आणि हर्षल पटेलची शिकार केली. सुनिल नरेनने शाहबाज अहमदची विकेट घेत आरसीबीची अवस्था 6 बाद 83 अशी केली.

केकेआरचे जोरदार बाऊन्स बॅक आरसीबीसमोर ठेवले 205 धावांचे आव्हान 

कोलकाता नाईट रायडर्सने 89 धावांवर 5 विकेट्स गेल्या असताना शार्दुल ठाकूरने 63 आणि रिंकू सिंहने 46 धावांची खेळी केली. या दोघांच्या 103 धावांच्या शतकी भागीदारीमुळे केकेआरने 20 षटकात 7 बाद 204 धावा ठोकल्या. गुरबाजनेही 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.

शार्दुल ठाकूरचा धडाका

केकेआरने 89 धावांवर निम्मा संघ गमावल्यानंतर वाटले होते की केकेआरच्या हातून सामना निसटला. मात्र केकेआरचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने धडाकेबाज फलंदाजी करत 20 चेंडूत नाबाद 51 धावा ठोकल्या. यामुळे 17 व्या षटकात केकेआरने दीडशतकी मजल मारली.

गुरबाजचे दमदार अर्धशतक 

विलीने पाठोपाठ दोन विकेट्स घेतल्यानंतर सलामीवीर रहमनुल्ला गुरबाजने आक्रमक फलंदाजी करत 44 चेंडूत 57 धावा ठोकल्या. त्याने रिंकू सिंहच्या जोडीने 42 धावांची भागीदारी रचत संघाला नव्वदीच्या जवळ पोहचवले. अखेर त्याला कर्ण शर्माने बाद केले. कर्ण शर्माने पाठोपाठ आंद्रे रसेलला देखील बाद करत केकेआरची अवस्था 5 बाद 89 अशी केली.

26-2 : डेव्हिड विलीने येता क्षणी दिले धक्के

फाफ ड्युप्लेसिसने आजच्या सामन्यात टोप्लेच्या ऐवजी डेव्हिड विलीला संधी दिली. विलीने या संधीचे दुसऱ्या षटकात सोनं केलं. विलीने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरला 3 तर त्याच्या पुढच्याच चेंडूवर मनदीप सिंगचा त्रिफळा उडवला.

आरसीबीने नाणेफेक जिंकली

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या संघात एक एक बदल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com